राऊतांच्या मुलीने बनवलेली राखी सुप्रियाताईंनी अजितदादांना बांधली...

"माझा दादा" असा उल्लेख सुप्रियाताई नेहमी करतात, त्यात भावाविषयीचा आदर तर असतोच, पण हा भाऊ खंबीरपणे पाठीशी उभा असतो हेही त्यांच्या या वाक्यातून प्रतित होत असते.
40ajit_pawar_supriya_sule_20ff_0.jpg
40ajit_pawar_supriya_sule_20ff_0.jpg

बारामती :  पवार कुटुंबियांची रक्षाबंधन व भाऊबीजेची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अखंडीतपणे सुरुच आहे. अजितदादा कितीही घाईत आणि कोठेही असले तरी राखी बांधायला ते सुप्रिया सुळे यांच्याकडे आवर्जून जातातच. या बहिण भावाच नातं आगळं असचं आहे. यंदा खासदार संजय राऊत यांच्या मुलीने बनवलेली राखी सुप्रियाताईंनी अजित पवार यांना बांधली.

"माझा दादा" असा उल्लेख सुप्रियाताई नेहमी करतात, त्यात भावाविषयीचा आदर तर असतोच, पण हा भाऊ खंबीरपणे पाठीशी उभा असतो हेही त्यांच्या या वाक्यातून प्रतित होत असते.

 भावाबहिणच नातं काही वेगळच असत. मग ते भाऊ बहिण अगदी राजकीय सेलिब्रेटी असले तरीही खासदार सुप्रिया सुळे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दरवर्षीचा रक्षाबंधन असाच वेगळा असतो. आज मुंबईत अजित पवार राखी बांधून घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याकडे गेल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रतिभाताई पवार यांनीही मोठ्या कौतुकाने हा क्षण अनुभवला. 

सुप्रियाताईंनी स्वतःची राखी बांधल्यावर खासदार संजय राऊत यांच्या मुलीने बनवलेली राखी अजित पवार यांना बांधली. ती बांधतांना राऊत यांच्या मुलीने स्वतः तयार केलेली ही राखी आहे. हे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत. यानंतर गडबडीत दादांना टोपी घालायची त्या विसरुन गेल्या, त्यावर मिश्किल हसत दादांनीच त्यांना ओवाळण्यास सांगितले. 

काही मिनिटांचाच हा प्रसंग स्वतः सुप्रिया सुळे यांनीच फेसबुकवर व्हायरल केला. बहिण भावाच्या प्रेमाचा हा प्रसंग स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रतिभाताई पवार यांनीही कौतुकाने पाहिला. सदानंद सुळे यांनी हा प्रसंग कॅमे-यात टिपला. ओवाळून झाल्यावर अजित पवार यांच्या पाया पडून सुप्रिया सुळे यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.

Edited  by : Mangesh Mahale  
 

हेही वाचा : राजकारणात सगळेच काचेच्या घरात राहतात... 

मुंबई : काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये...असा नियम आहे. कोणी कोणाकडे बोट दाखवू नये, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. याबाबत त्यांनी आज सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारे टि्वट केले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. संजय राऊत म्हणाले,  "राजकारणात सगळेच काचेच्या घरातच राहतात...माझा कोणावरही रोख नाही." अभिनेता सुंशात सिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. या तपासाबाबात राऊत म्हणाले की मुंबई पोलिस सुशांत सिंग प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम आहेत. याविषयी गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस आयुक्त याबाबत अधिक बोलतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com