बुलढाणा : चार दिवासांवर आलेल्या राजमाता जिजाऊ जन्म उत्सवासाठी महाराष्ट्राची अस्मिता असलेला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड़राजा येथील राजमाता जिजाऊंचा जन्मस्थळ असलेला राजवाडा अजूनही बंदच आहे. सरकारने आध्यात्मिक स्थळ, पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी उघडली आहेत. मात्र, कोरोनाच्या नावाने बंद केलेली ऐतिहासिक स्थळ अजूनही बंदच असल्याने पर्यटकांचा हिरमुड होत आहे.
महापालिका निवडणुकांसाठी भाजपचे प्रभारी जाहीर#राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/KHZxQafweV
— Sarkarnama (@SarkarnamaNews) January 7, 2021
येत्या 12 तारखेला राजमाता जिजाऊंचा जन्मउत्सव आहे. त्यांच्या जन्मस्थळी म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड़राजा येथे मराठा सेवा संघातर्फे सर्वात मोठा उत्सव दरवर्षी येथे साजरा होत असतो, पण यावर्षी कोरोनामुळे हा सोहळा छोटेखानी कार्यक्रमात होणार असल्याचं आयोजकांनी सांगितल आहे. तरी या कार्यक्रमात मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार यावर्षी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिला जाणार आहे. त्यासाठी सिंदखेड़राजा येथील कार्यक्रम स्थळ जिजाउं सृष्टी आतापासून दिव्यांच्या झगमागाटात सजवली गेली आहे. परंतु जवळच असलेल्या जिजाऊंचे जन्मस्थळ हे अजूनही अंधारात आणि कुलुपबंद स्थितीत आहे.
सध्या हा राजवाड़ा पुरातत्व विभागाच्या देखरेखीत आहे. पण जिजाऊंच्या जन्म सोहळ्यासाठी या परिसराची साधी साफसफाई किंवा एखादा दिवा सुद्धा लावण्याचे काम पुरातत्व विभागाने केलेले नाही. एकीकडे झगमगाट तर मुळ जन्मस्थळ अंधारात अशी काहीशी स्थिति रात्री बघवायास मिळाली आहे. याबाबतीत पुरातत्व उपसंचालक नागपुर कार्यलयात चौकशी केली असता उपसंचालक सुटीवर असल्याचं माहिती मिळाली आहे. या भागाचा पदभार नाशिक पुरातत्व विभागाचे उपसंचालक यांच्याकडे असल्याची माहिती मिळाली आहे,
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय, जिल्हा प्रवक्ता अभयसिंह मारोड़े म्हणाले की ज्या छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जीजाऊंच्या नावावर सत्ता स्थापन करून राज्यकर्ते राज्य करीत आहेत, त्याच्या अस्मितेचा आज राज्यकर्त्यांना विसर पडल्याची चर्चा आहे.
जिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १२ जानेवारी १५९८ साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागूनच आहे. याच वास्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे.

