"ओबीसींच्या ताटातील आरक्षण देणार नाही"... मराठा समाजाचे नेते वातावरण बिघडवित आहेत...? - In the quota of OBC Will not give reservation  Maratha community leaders are spoiling the atmosphere  | Politics Marathi News - Sarkarnama

"ओबीसींच्या ताटातील आरक्षण देणार नाही"... मराठा समाजाचे नेते वातावरण बिघडवित आहेत...?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

आमदार, मंत्री यांनी सर्व समाजाची बाजू लावून धरायला हवी. सरकार दोन समाजात भांडण लावण्याचं काम करते आहे. ओबीसीचा ताटातील आरक्षण आम्ही देणार नाही.

मुंबई :  "ज्या दिवशी कायदा पास झाला तेव्हा यांनी जल्लोष केला, आणि आता त्याच कायद्याला विरोध करीत आहेत. हे चुकीचं आहे. मराठा समाजाचे नेते वातावरण बिघडवण्याचं काम करीत आहेत," असा आरोप ओबीसी समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आज केला. ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समितीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शेंडगे यांनी हा आरोप केला आहे. येत्या तीन तारखेला तहसीलदार कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहे.

"मराठा समाजाला आरक्षण मिळेल, यासाठी सहा वर्षांपासुन ते वाट पाहत आहेत, हजारों विद्यार्थ्यांचे यामुळे आयुष्य उद्धवस्त होत आहे, १३ टक्के जागेसाठी ८७ टक्के जागा सडवल्यात हे शहाणपण कुठलं ? असा प्रश्न प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला आहे.  

"मराठा आरक्षणामुळे ११ वीचे प्रवेश थांबले आहेत, १२ वीचे प्रवेश थांबवले आहेत. ओबीसीसमोर आता आंदोलनाशिवाय कुठलाच पर्याय नाही. ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना जर आरक्षण द्या, अशा प्रकारचे कुठलाही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पारीत करू नये, नाहीतर ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, " असा इशारा शेंडगे यांनी यावेळी दिला आहे. मराठा आरक्षणामुळे  पोलिस भरती थांबली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजाच्या एकाही प्रश्नावर निर्णय घेण्यात आला नाही, असे शेंडगे यांनी स्पष्ट केलं. 

प्रकाश शेंडगे म्हणाले की आमदार, मंत्री यांनी फक्त मराठा समाजाची बाजू लावून न धरता त्यांनी सर्व समाजाची बाजू लावून धरायला हवी. सरकार दोन समाजात भांडण लावण्याचं काम करते आहे. ओबीसीचा ताटातील आरक्षण आम्ही देणार नाही. ओबीसींनी रस्त्यावर भिख मागायची का..? मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण दिले तर एकाही मंत्र्यांना ओबीसी समाज महाराष्ट्रात फिरू देणार नाही. ओबीसी समाजासाठी एकटे विजय वडेट्टीवार भांडत आहेत. पण इतर नेते गप्प आहेत.

  

हेही वाचा: पंकजा मुंडेंना शिवसेनेची ऑफर उद्धव ठाकरेचं देऊ शकतात...  

पुणे  : ‘भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या चांगल्या नेत्या आहेत. त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांना जर शिवसेनेत घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑफर देतील.’ असं सूचक विधान शिवसेनेचे  खासदार संजय राऊत यांनी आज केले.  पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालापात राऊत बोलत होते. माजी मुख्यमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक संजय राऊत यांनी केलं. एकनाथ खडसे यांच्यानंतर आता पंकजा मुंडे भाजपा सोडणार असल्याच्या राजकीय चर्चा सध्या रंगत आहेत. पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना संजय राऊत म्हणाले की पंकजा मुंडेंविषयी मला फार माहिती नाही. आमच्याकडून कोणी अशी ऑफर दिलेली नाही. त्यांना अशाप्रकारची ऑफर फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं देऊ शकतात. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख