शेंडी-जानवे, हा शब्द विधीमंडळात वापरणारे ठाकरे हे पहिले मुख्यमंत्री!

प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा उद्धव चालवत असल्याचे मत
khedekar-Thaceray
khedekar-Thaceray

बुलडाणा : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचे कौतुक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले आहे. हिंदुत्वावर रोखठोक मते मांडल्याबद्दल खेडेकर यांनी अभिनंदन केले आहे.

हिंदुत्वावर शिवसेनेने मत अतिशय स्पष्ट व रोखठोक , निर्भिडपणे मांडलेले आहे. ठाकरेंच्या प्रभावी भाषणातून जाणिवपूर्वक दिलेला बहुजन संदेश आहे. परंतू दुर्दैवाने दूरगामी परिणाम करणाऱ्या ठाकरेंच्या या वक्तव्यावर लक्ष गेलेले दिसत नाही, खेडेकर यांनी म्हटले आहे.   
  
``मुख्यमंत्री ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपचे हिंदुत्व व शिवसेनेचे हिंदुत्व यातील फरक स्पष्टपणे विधानसभेत मांडला. तुमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व आहे, अशी परखड भूमिका ठाकरेंनी विधानसभेत मांडल्याबद्दल मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो, असे खेडेकर म्हणाले आहेत. 

माझ्या माहितीप्रमाणे विधीमंडळात "शेंडी जानवे" हे शब्द वापरणारे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील एकमेव मुख्यमंत्री असावेत. शिवसेना हा "शेंडी जानवे" जपणारा राजकीय पक्ष नाही हे बिनधास्तपणे विधीमंडळात मांडून ठाकरे यांनी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचेच आपण वैचारिक व कृतीशील वारसदार असल्याचे सिद्ध केले आहे. खरे म्हणजे सर्व पुरोगामी चळवळीतील नेते व विधीमंडळात जिजाऊ, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, आण्णा भाऊ, गाडगेबाबा यांच्या नावाने गेलेल्या सर्वपक्षीय आमदारांनी या रोखठोक वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे एकमुखी अभिनंदन केले पाहिजे, अशी भूमिका खेडेकर यांनी मांडली आहे.  

``ठाकरेंचे हे वक्तव्य जेथे मिरचीसारखे झोंबणे आवश्यक होते तेथेच ते अगदी तंतोतंत झोंबलेले असल्याचे काही मिनिटांतच लक्षात आले. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मिडिया समोर केलेल्या विधानाचा रोख "शेंडी जानवे" याबाबत होता हे लक्षात येते. फडणवीसांनी ठाकरे यांचे भाषण हे एखाद्या चौकातील भाषणासारखे होते. कारण त्याला विधीमंडळात बोलतात ती उंचीच नव्हती, असे म्हटले.  भारतीय इतिहासातील अशा अनेक घटनांचा तपशील लक्षात घेतला तर आज देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या भाषेबद्दल हिणकस वक्तव्य केेले आहे. असे वक्तव्य त्यांच्याशी संबंधित अनेकांनी केले आहे, असे निरीक्षण खेडेकर यांनी नोंदविले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com