शेखर गायकवाड यांना सरकारने बळीचा बकरा बनविले....

पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यांना सरकारने बळीचा बकरा बनवले.
Girish Bapat.jpg
Girish Bapat.jpg

पुणे ; पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यांना सरकारने बळीचा बकरा बनवले. गेल्या काही महिन्यात कोरोना संक्रमण रोखण्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना असे अचानक बदलणे योग्य नाही, अशी भूमिका घेत अचानकपणे लादण्यात आलेले लॉकडाउन व गायकवाड यांच्या बदलीचा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी निषेध केला आहे.

पुण्यात विरोधकांना विचारात न घेत लादण्यात आलेले लॉकडाउन अनावश्‍यक आहे. राज्य सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचे बापट यांनी काल दुपारीच सांगितले होते. त्यानंतर सायंकाळी गायकवाड यांच्य बदली
करण्यात आल्याने खासदार बापट यांनी वरील दोन्ही गोष्टींचा निषेध केला आहे. या संदर्भात बोलताना खासदार बापट म्हणाले, ‘‘ सरकार आम्हाला राजकारण करू नका, असे एकिकडे सांगताना असे निर्णय राजकीय अभिनिवेशातून घेतले आहेत काय अशी शंका येऊ लागली आहे.

पुणे महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने असे धरसोडीचे राजकारण राज्य सरकार करू लागले आहे. आधी अचानक लॉकडाउन आणि आता प्रमुख
अधिकाऱ्यांची बदली ही चुकीची गोष्ट करण्याची मालिका सरकारने सुरू केली आहे. पुण्यात काम करताना गायकवाड यांनी योग्य दिशेने काम सुरू ठेवले होते.

महापालिकेतील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व गायकवाड यांच्यात चांगला समन्वय होता. चांगले काम करणाऱ्या आधिकाऱ्यांना ऐन संकटाच्या काळात बदलने योग्य नाही.’’पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातल्या प्रमुख आधिकाऱ्यांच्या तातडीने बदली केली आहे. पुणे महापालिकेचे माजी आयुक्त तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेल्या सौरभ राव यांना विभागीय आयुक्तालयात विशेष कार्याधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पीएमआरडीएचे कार्यकारी आधिकारी विक्रमकुमार यांना महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या गायकवाड यांची अचानक बदली करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Edited  by : Mangesh Mahale

हेही वाचा: कॅाग्रेसने सोपवली हार्दीक पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी... 

पुणे : पाटीदार समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गुजरातमध्ये मोठं आंदोलन झालं होतं. या आंदोलनाचा मुख्य चेहरा हार्दीक पटेल होता. हार्दिक पटेल यांना आता कॅाग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. गुजरात कॅाग्रेस कार्याध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरातमध्ये आपली ताकद वाढविण्यासाठी कॅाग्रेसने हार्दीक पटेल यांच्यामाध्यमातून नवा युवा चेहरा दिला आहे. हार्दिक पटेल यांची तत्काळ नियुक्ती करायला परवानगी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी दिली असल्याची माहिती काँग्रेसचे संघटना महासचिव केसी वेणुगोपाल यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com