चंद्रकांत पाटील आता ‘हिमालयात’ कधी जाणार... खडसेंचा सवाल 

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या अहंमपणामुळे हे घडले आहे.
0Chandrakant_20Patil_20Eknath_20Khadse_20New.jpg
0Chandrakant_20Patil_20Eknath_20Khadse_20New.jpg

जळगाव : राज्यात विधानपरिषद निवडणूकीत भाजपचा दणदणीत पराभव झाला आहे. पुणे आणि नागपूर येथील पारंपारिक जागाही गमवाव्या लागल्या आहेत. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या अहंमपणामुळे हे घडले आहे. पुण्याची जागा पराभूत झाली तर आपण हिमालयात निघून जावू असे जाहिरपणे सांगणारे चंद्रकांत पाटील आता हिमालयात कधी जाणार ? याचीच आपण वाट पाहत आहोत, असे सणसणीत टोला माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

मुक्ताईनगरात पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, "विधानपरिषदेच्या सहा जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. पाच जागावर भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. धुळे-नंदुरबार मतदार संघात भाजपचा उमेदवार विजयी झाला. मात्र भाजपच्याच नेत्यांनी मान्य केले आहे  कि महाविकास आघाडीचे मते फुटल्याने आम्हाला यश मिळाले आहे. त्यामुळे सहावी जागाही त्यांची गमावल्यासारखीच आहे. भारतीय जनता पक्षाची या निवडणूकीत पिछेहाट झाली आहे.

 
पाटील, फडणवीसाचा अहंपणा नडला

भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांचा अहमंपणा पक्षाला नडला आहे. आम्ही सांगू तेच होईल ! असा त्यांचा नेहमी आव असतो, पक्षातून कुणीही बाहेर गेले तरी काही फरक पडणार नाही, असे म्हणत असतात .त्यांना आता दिसून आले आहे, कि पक्षातून लोक बाहेर गेल्यावर काय परिस्थिती होते ? फडणवींसाच्या नागपूर पदवीधर आणि पाटील यांच्यामुळे पुणे पदवीधर मतदार संघातील जागा भाजपला गमावावी लागली आहे.
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण पुणे येथील पदवीधर मतदार संघातील जागा पडली तर हिमालयात जाणार आहोत, अशी घोषणा केली होती. भाजपच्या ताब्यात गेली ५० वर्षे असलेली पूणे पदवीधर मतदार संघातील जागा भाजपणे गमावली आहे. ते आता हिमालयात कधी जाणार आहेत. याचीच आपण वाट पाहत आहोत.
 
सुशिक्षितांचा महाविकास आघाडीवर विश्‍वास

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील सुशिक्षित मतदारांनी महाविकास आघाडीवर विश्‍वास व्यक्त केला आहे, असे खडसे म्हणाले. गेल्या पाचवर्षात भाजप सरकारने सुशिक्षित मतदारांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे आता या मतदारांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामावर विश्‍वास व्यक्त करून मतदान केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे एक वर्षाचे काम या मतदारांना आवडले आहे. हेच या निकालवरून दिसून येते, असे खडसे यांनी स्पष्ट केले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com