पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पंकजा मुंडेवर मुलीसारखे प्रेम

भाजपमध्ये कोणीही नाराज नसल्याचा चंद्रकांत पाटील यांचा दावा
pankja munde-modi
pankja munde-modi

कोल्हापूर : भाजपमध्ये कोणी नाराज नसून कोणीही पक्ष सोडणार नसल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना बुधवारी केला.

पक्षाच्या अंतर्गत मतभेदांवर भाष्य करताना पाटील म्हणाले, "एकनाथ खडसे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. विधान परिषद तिकीट वाटपावरून ते जरी नाराज असले तरी त्यांचे मन वळवण्यात यश मिळाले आहे. पण या वयात त्यांना आमदारकी कोण देणार, त्यांचा सन्मान कसा राखणार अशा प्रकारे त्यांची समजूत काढली. पंकजा मुंडे यांच्यावरही नरेंद्र मोदी यांनी मुलीसारखे प्रेम केले आहे. त्यामुळे त्याही पक्षापासून फारकत घेणार नाहीत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे.

कागलात बसून माझ्या नावाने का ओरडता?

मी कोथरुडचा आमदार असल्यामुळे तेथील प्रश्‍नावर मला लक्ष द्यावे लागते. कोल्हापुरच्याही मी सातत्याने संपर्कात असतो. कोरोनासारख्या संकटात आम्ही अग्रेसर आहोत. आता तर 81 वॉर्डात कोणत्याही डॉक्‍टरांकडे रुग्ण गेल्यास त्याचे बिल आमच्याकडे पाठवावे. इतके सुक्ष्म काम आम्ही करत आहोत. मात्र कागलमध्ये बसून आमच्या नावाने ओरड का करता, असा सवाल पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारला. ज्या लक्ष्मीदर्शनाचा उल्लेख मुश्रीफ सातत्याने करतात त्यांनीही तसा प्रयोग करावा. त्यासाठी स्वतःच्या खिशातील पैसे देण्याचे धाडस असावे लागते. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करण्याकडे मुश्रिफ यांनी अधिक लक्ष द्यावे. असा टोला त्यांनी लागावला.


ही बातमी पण वाचा : केंद्रातील सरकार बरखास्त करा; मंत्री मुश्रीफ यांची मागणी 

कोल्हापूर : देशात कोरोना संसर्ग रोखण्यात अपयश आल्याबद्दल केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार सर्वात आधी बरखास्त केलं पाहिजे, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. मुंबईतील कार्यालयातून त्यांनी ही प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाच्या कामाचे कौतुक केले. 

श्री. मुश्रीफ म्हणाले,"आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जागर केला व आपला करारी बाणा दाखविला. देशासह राज्यात कोरोना संसर्ग वाढतच असताना सर्वांनी एक होऊन कोरोनाशी लढणं अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत भाजपा मात्र राजकारण करण्यात गुंतली आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात सतत तक्रारी करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिलवरून राजभवनात तक्रारी करण्यासाठी सतत येणं फारच लांब पडतय आणि यामध्ये त्यांचा फारच वेळ जातोय. यापेक्षा त्यांनी राजभवनातच एखादी खोली घेऊन राहावे.
महाविक आघाडी सरकारने राजीनामा द्यावा असं म्हणणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी अमेरिकेचे अध्यक्ष केले पाहीजे, असा टोलाही श्री. मुश्रीफ यांनी लगावला.

पक्षाच्या अंतर्गत मतभेदांवर भाष्य करताना पाटील म्हणाले, "एकनाथ खडसे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. विधान परिषद तिकीट वाटपावरून ते जरी नाराज असले तरी त्यांचे मन वळवण्यात यश मिळाले आहेत. पण या वयात त्यांना आमदारकी कोण देणार, त्यांचा सन्मान कसा राखणार अशा प्रकारे त्यांची समजूत काढली. पंकजा मुंडे यांच्यावरही नरेंद्र मोदी यांनी मुलीसारखे प्रेम केले आहे. त्यामुळे त्याही पक्षापासून फारकत घेणार नाहीत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com