प्रताप सरनाईक काही साधु-संत नाहीत, राणेंचा टोला..

कायदेशीर गोष्टींची चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते,असे ते म्हणाले. तसेच सरनाईक हे काही साधूसंत नाहीत, असा टोला मात्र राणे यांनी लगावला.ईडीची ही कारवाई योग्य की अयोग्य हे सांगा, मगत्यावर बोलतो,असे ते म्हणाले.
Mp Narayan Rane news Mumbai
Mp Narayan Rane news Mumbai

मुंबई ः ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर आज सकाळी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला.त्यावर शिवसेनेचे कट्टर विरोधक भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी सरनाईक काय साधूसंत नाहीत, अशा तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या दोन मुलांच्या घर आणि कार्यालयांवर धाड टाकत ईडीने केलेल्या कारवाईने राज्यभरात खळबळ उडाली आहे. सरनाईक यांचे पुत्र विहंग यास ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात देखील घेतले आहे. त्यानंतर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे युद्धच सुरू झाले आहे. भाजपचे नेते राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी देखील यात उडी घेतली आहे.

यावर थेट प्रतिक्रिया न देता कायदेशीर गोष्टींची चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते,असे ते म्हणाले. तसेच सरनाईक हे काही साधूसंत नाहीत, असा टोला मात्र राणे यांनी लगावला. ईडीची ही कारवाई योग्य की अयोग्य हे सांगा, मग त्यावर बोलतो,असे ते म्हणाले.

सबुरीने घ्या..

तर ईडीच्या कारवाईला घाबरण्याचे कारण नाही. शिवसेनेचे प्रताप सरनाईक दोषी नसतील तर त्यांनी व त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी घाबरू नये, सबुरीने घ्यावे, असा सल्ला माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे. ईडी ही स्वतंत्र संस्था आहे, त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतात हे सांगायला देखील देशमुख विसरले नाहीत. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com