'त्या' पोलिसांना अटक करा, अन्यथा आंदोलन.. आंबेडकरांचा गृहमंत्र्यांना इशारा - Prakash Ambedkar warns against agitation against Home Minister Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

'त्या' पोलिसांना अटक करा, अन्यथा आंदोलन.. आंबेडकरांचा गृहमंत्र्यांना इशारा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 सप्टेंबर 2020

अनिल देशमुख यांनी सरकार पाडण्याचा कट करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी, अन्यथा  धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. 

पुणे : सरकारविरोधात कट करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एनआयए अंतर्गत अटक झाली पाहिजे, अशी मागणी वंचित विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकार पाडण्याचा कट करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी, अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. 

एका वेबसाइडला मुलाखत देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की राज्यातील काही आयपीएस अधिकारी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला असल्याचा त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सत्ताधारी पक्षाला पाडण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांमार्फत केला जात होता. अशाप्रकारे सरकार विरोधात कट करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोक्का एनआयए अंतर्गत अटक करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आता अनिल देशमुख यांच्या कोर्टात चेंडू असून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले.
 
पोलिस अधिकारी सरकार पाडणार होते.. असं मी म्हणालोच नाही : गृहमंत्री  

मुंबई :  "काही पोलिस अधिकारी सरकार पाडणार होते, असे मी म्हणालो नाही. ते वक्तव्य खोटे आहे, माझ्या तोंडी 'ते' शब्द टाकण्यात आले," असा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. काल एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत काही पोलिस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, तो हाणून पाडला, असं व्यक्तव्य देशमुख यांनी केल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी हा खुलासा केला आहे.   

एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांसह चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही वेळीचं तो हाणून पाडला, असा गैाप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला होता. त्यानंतर देशमुख यांनी या वृत्ताचे खंडण केलं आहे. "तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने करून आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे प्रकार समोर आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हे प्रकरण योग्य पद्धतीनं मार्गी लावलं," असं देशमुख यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्ह्टलं होतं. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख