मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्या येत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. काल एका व्यक्तीने त्यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत सोमय्या यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात आवाज उठविल्यामुळे म्हणून मला गोळ्या मारण्याची, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत सोमय्या यांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ शेअर केला आहे.
कुलसचिवांच्या नेमणुकांवरुन टीका#राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/4xltHDlAKD
— Sarkarnama (@SarkarnamaNews) January 18, 2021
किरीट सोमय्या म्हणाले की काल मला एका व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. मी शरद पवार साहेबांना सांगू इच्छितो धनंजय मुंडे यांची हकालपट्टी झाली पाहिजे, मी अशा धमक्यांना घाबरत नाही.
याबाबत पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे सोमय्या यांनी तक्रार केली आहे. रविवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. गेल्या काही दिवसापासून त्यांना अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप एका महिलेने केला आहे, याबाबत सोमय्या यांनी आवाज उठविला होता. त्यामुळे आपल्याला या धमक्या येत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
हेही वाचा : अर्णब गोस्वामीने भाजपचे तोंड काळे केले......
मुंबई : "मुंबई पोलिसांनी फक्त टीआरपी घोटाळय़ातील गोस्वामी टोळीचा सहभाग उघड केला नाही तर देशाचे संरक्षण तसेच राष्ट्रीय सुरक्षेबाबत या टोळीने चालवलेले खेळही उघडे केले आहेत. आता ‘अर्णब’चा आणि आपला काही संबंध नसल्याचे भाजप पुढारी सांगत आहेत. या गोस्वामी टोळीने राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचे तोंड काळे केले आहे,'' अशा थेट शब्दात शिवसेनेने 'सामना' च्या अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांवर कोरडे ओढले आहेत. मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बनावट टीआरपी रॅकेटमध्ये रिपब्लिक भारत, फक्त मराठी, महा मूव्ही आणि बॉक्स सिनेमा या चार चॅनेलचा समावेश होता. त्यांनी बनावट पद्धतीने टीआरपी मिळवल्याचे समोर आले होते. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट हे विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी उघड केले आहे. यामुळे खळबळ उडाली असून, गोस्वामींच्या अडचणीत वाढ झाली आहे.

