राष्ट्रवादीत चाललय काय... - Politics nilesh rane tweet ncp Sharad Pawar dhananjay munde nawab malik | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीत चाललय काय...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुंडे आणि नवाब मलिक प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करीत आहेत. मुंडे यांच्याविरोधात पोलिसांकडे एका तरुणीने बलात्काराची तक्रार दिली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे, तर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मुंडे, मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे.

भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुंडे आणि नवाब मलिक प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी टि्वट करून म्हटलं आहे की इतके गुन्हेगार मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत. 

निलेश राणे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की  मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंट मुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललय काय?? इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत. 

काय चाललंय महाराष्ट्रात??? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी?? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशांनी पोलिसांवर विश्वास उडेल लोकांचा... सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं,  असे निलेश राणे यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. 

हेही वाचा : शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी..
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आल्यानंतर राजकारण पेटले आहे. भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी या प्रकरणावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. याबाबत भातखळकर यांनी टि्वट केलं आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावरून भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  व शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. अतुल भातखळकर आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी. पोलिस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे.''  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख