महाविकास आघाडी टिकावी, ही राष्ट्रवादीची भूमिका.. - Politics Maharashtra The role of the NCP is to sustain the Mahavikas Aghadi | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडी टिकावी, ही राष्ट्रवादीची भूमिका..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 जानेवारी 2021

विकास कामांना महत्त्व द्यावं, ही भूमिका शरद पवारांची आहे. आम्हीही याच भूमिकेचं समर्थन करून पुढे जात आहोत.

मुंबई : ''लोकशाहीत जे निवडून येतात त्यांना बहुमताच्या जोरावर काही अधिकार असता त्या अधिकाराचा वापर कसा करावा, हा ज्याने त्याने आत्मचिंतन करून निर्णय घ्यावा. काहींचे मुद्दे बरेच वर्ष डोक्यात होते. त्यावेळी ते पुढे रेटता आले नाही. आता त्यांना वाटतंय हा प्रश्न सुटावा. पण हा प्रश्न सुटत असताना महाविकास आघाडी टिकावी, ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. विकास कामांना महत्त्व द्यावं, ही भूमिका शरद पवारांची आहे. आम्हीही याच भूमिकेचं समर्थन करून पुढे जात आहोत,'' असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले. 

अजित पवार म्हणाले, ''कुणी काय मागणी करावी, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कुणी भावनिक मुद्दे काढलं, कुणी विकासाबद्दतल बोलतं कुणी नामकरणाबद्दल बोलत आहे. राज्याच्या ६० वर्षाच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी झाल्या आहेत. कोण औरंगाबाद बद्दल बोलतं, कोण नगरबद्ल बोलतं आता पुण्याबद्दल बोलत आहेत. त्यामुळे आणखी कुणाला काय काय सुचायला  लागत ते त्याची मागणी करीत आहे. त्यांचा तो अधिकार आहे.  आपण अनेक विमानतळांना मान्यवरांची नावं दिलेली पाहिली.
उत्तर प्रदेशात मायावती आल्यानतंर त्यांनी अनेक जिल्ह्यांची, शहरांची नावं बदलून टाकली आहे.''
 
''मी तीस वर्ष ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाहतो आहे. ग्रामपंचायत निवडणुक ही पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नाही. कुठला सदस्य कुठल्या पक्षाचा हे कधी कळत नाही. कारण तिथं पक्षाचं चिन्हं नसतं. जे निवडून येतात. ते सांगतात आम्ही तुमच्याच पक्षाचे आहोत आणि काम करून घेतात.  आमच्या इथेही दोन गट उभे राहतात, जे निवडून येतात ते आम्हाला येऊन भेटतात आणि म्हणतात आम्ही साहेबांचेच आहोत,'' असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रीमियमवर 50 टक्के सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने काल घेतला आहे. या निर्णयावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ग्राहकांचे हित लक्षात न घेता हा निर्णय घेतला असल्याचे विरोधकांचे मत आहे. 

या निर्णयावर  अजित पवार ते म्हणाले, ''ही सवलत ग्राहकांच्या फायद्याची आहे. या निर्णयाचा विकासकांची नाही तर ग्राहकांनाच फायदा होणार आहे, याबाबत विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहे.'' राज्य सरकारचा कारभार किमान समान कार्यक्रमावर सुरू आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले. 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख