भविष्यात भाजप उरणार नाही...फडणवीस काहीही बोलतात.... - Politics Maharashtra Operation Lotus Nana Patole reaction to the statement of Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

भविष्यात भाजप उरणार नाही...फडणवीस काहीही बोलतात....

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

राज्यात आँपरेशन लोटस होणार नाही. भविष्यात भाजप उरणार नाही, असे नाना पटोले म्हणाले. 

मुंबई : "शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिल्याचे उद्धव ठाकरे खोटं बोलत आहेत. मी बंद खोलीत राजकारण करणारा व्यक्ती नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडपणे करतो," असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल केले. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मुख्यमंत्रीपदाबाबत एक वर्षांनी अमित शाह बोलले, त्याला काय अर्थ आहे का" असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात 'ऑपरेशन लोटस' होणार याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. यावर पटोले म्हणाले, "देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत, ते काहीही बोलतात. राज्यात आँपरेशन लोटस होणार नाही. भविष्यात भाजप उरणार नाही." राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना मांडणी केली आहे. उपमुख्यमंत्री पदाबाबत ज्येष्ठ नेते बघतील," असे पटोले म्हणाले. 

अमित शहा ज्या प्रदेशात जातात, तो प्रदेश शतप्रतिशत भाजपमय होतो. राज्यातही त्यांच्या दौऱ्यामुळे सत्तांतराचे शुभसंकेत आहेत. लवकरच राज्यात भाजपचा मुख्यमंत्री पहायला मिळेल, असा दावा भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी कणकवली येथे नुकताच केला होता.   

श्रेयवादापोटी राज्यातील मंत्रीच एकमेकांच्या मतदारसंघातील विकासकामांना खो देत असल्याचे राज्यातील विकास प्रक्रिया ठप्प झाली आहे. शिवसेनेचे सर्व आमदारदेखील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस मंत्र्यांच्या कारभाराला कंटाळले आहेत, असेही ते म्हणाले. 
 
जठार म्हणाले, "राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांच्या सरकारमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाही. तीनही पक्षातील मंत्री एकमेकांच्या मतदारसंघातील विकासकामे अडवून ठेवत आहेत. आडाळी येथे वनस्पती संशोधन प्रकल्प मंजूर झाला. पण, त्याचे श्रेय शिवसेनेला मिळेल म्हणून कॉंग्रेसचे अमित देशमुख यांनी या प्रकल्पाला खो घातला आहे. नाणार येथे रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाची मंडळी आग्रही आहेत. मात्र, नाक कापले जाईल, या भीतीने शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध सुरू ठेवला आहे. 
  
जठार म्हणाले, "सर्वच विकासकामांच्या बाबतीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडी पक्षाची मंडळी एकमेकांना खो देण्याचे काम करत असल्याने राज्यातील शिवसेना पक्षाचे आमदार कंटाळले आहेत. कॉंग्रेस पक्षाचे मंत्री आणि आमदार तर आधीच बॅकफुटवर गेले आहेत. याखेरीज राष्ट्रवादीचे मंत्री सत्तेचा गैरफायदा उठवत असल्याने मुख्यमंत्र्यांनीही फायलींवर स्वाक्षरी करणे बंद केले आहे. या साऱ्यांत नोकरशहा मंडळीही सरकारच्या कारभाराला वैतागली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच सत्तांतर होईल आणि भाजपचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही.'' 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख