सत्तेसाठी शिवसेना लाचार..बाळासाहेबांच्या तत्वांना मूठमाती.. - Politics Maharashtra Home Minister Amit Shah targets Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

सत्तेसाठी शिवसेना लाचार..बाळासाहेबांच्या तत्वांना मूठमाती..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिल्याचं उद्धव ठाकरे खोटं बोलत आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. 

सिंधुदुर्ग : "सध्याचं तीन चाकी रिक्षाचं महाविकास आघाडी सरकारची तीनही चाके वेगवेगळ्या दिशेनं जात आहे. आम्ही तुमच्या रस्त्यात येणार ऩाही. सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली आहे," अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केली. 

भाजपा नेते नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रविण दरेकर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.   

अमित शाह म्हणाले की राज्यात निवडणुकीत शिवसेनेसोबत युती असताना उध्दव ठाकरे हे निवडणूक प्रचाराच्या बॅनरवर नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो लावून प्रचार करीत होते. मुख्यमंत्रीपदावर मी कुठलीही चर्चा केली नव्हती. मी कधीही बंद खोलीत राजकारण केले नाही. पण सत्तेसाठी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना मूठमाती दिली. स्वार्थासाठी ते सत्तेत आले आहे.  

अमित शाह म्हणाले, "शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिल्याचं उद्धव ठाकरे खोटं बोलत आहे. मी बंद खोलीत राजकारण करणारा व्यक्ती नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो. जनतेने जो भाजप- शिवसेना युतीला जनादेश दिला होता, या पवित्र जनादेशाचा अनादर करण्यात आला. निवडणुकीनंतर त्यांनी अपवित्र आघाडी केली. स्वार्थासाठी सरकार स्थापन झालं. ठाकरे म्हणतात आम्ही वचन तोडलं. आम्ही वचन पाळणारे माणसं आहोत. बिहारमध्ये आम्हाला अधिक जागा मिळाल्या तरीही आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं. नितीश कुमार यांनी भाजपचा मुख्यमंत्री करा असं म्हटलं होतं तरी आम्ही शब्द पाळला"

हेही वाचा : पेट्रोल दरवाढीवरून पवारांनी काढला भाजपवर जाळ... 
 
पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. "पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढून महागाई प्रचंड वाढल्याचं आकांडतांडव करणाऱ्या भाजपच्या जाहिराती अजून जनता विसरली नाही. पण त्या फक्त दिशाभूल करण्यासाठीच केल्या होत्या हे आता पेट्रोल-डिझेलच्या भडक्यात होरपळून निघत असलेल्या जनतेलाही कळलंय. त्यामुळं 'जनता माफ नहीं करेगी'चं बुमरंग भाजपावर उलटल्याशिवाय राहणार नाही," अशी फेसबूक पोस्ट रोहित पवार यांनी आज शेअर केली आहे.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख