मुंबई : ''राज्यकर्त्यांना आपला वेळ महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी केला पाहिजे, मात्र यांच राजकारण काय फक्त सुडाच राजकारण करत आहे. 'याची बिल्डिंग पाड त्याच्या भानगडी बाहेर काढ' यापलीकडे हे काहीही करत नाही, महाविकास आघाडी एकच लक्ष आहे भाजपा सत्तेवर आली कि आपण परत उभे राहू शकत नाही, अशी त्यांना भिती आहे,'' अशी टीका भाजपचे नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी केली आहे.
दारूबंदी या विषयावर सुधीर मुंनगंटीवार म्हणाले की ५८८ ग्रामपंचायतीचा ठरवा होता की दारू बंदी केली पाहिजे, आम्ही आमच्या काळात दारूबंदी केली. काँग्रेसच्या समितीने ज्या शिफारशी सांगितल्या त्याचीच अंमलबजावणी आम्ही केली होती. मात्र आताच्या काँग्रेसच्या काळात महात्मा गांधी यांच्या विचारधारेला थारा दिला जात नाही.
येडियुरप्पांना सीडीच्या माध्यमातून ब्लॅकमेल केले अन् मंत्रिपदे मिळवली; भाजप नेत्याचाच गौप्यस्फोट #Sarkarnama #MarathiNews #SarkarnamaNews #PoliticalNews #Karnataka #BJP #cabinetexpansion #cabinetshuffle #BSYediyurappa #BasangoudaYatnal #Viral #ViralNewshttps://t.co/kJG9SgvA99
— Sarkarnama (@SarkarnamaNews) January 13, 2021
हेही वाचा : जनतेशी नाळ तुटलेले महाबेशरम आघाडी सरकार...
मुंबई : देशभरातील विविध भागांमध्ये कोरोना लसीच्या वितरणास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात अशा भागांमध्ये कोरोनाची लस निर्धारित ठिकाणांच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहेत. प्रत्येक राज्यात, शहरात या लसीचं मोठ्या उत्साहात आणि तितक्यात सकारात्मकतेनं स्वागत केलं जात आहे. कोरोना लसींच्या साठवणुकीकरणासाठी मुंबईत यंत्रणा अपुरी असल्याचे सांगत भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर यांनी टि्वट करत हे सरकार महाबेशरम असल्याचे म्हटलं आहे. आपल्या टि्वटमध्ये अतुल भातखळकर म्हणतात, ''राज्यातील जनतेच्या लसीकरणाला सुरुवात करायची वेळ आली तरीही प्रादेशिक शीतगृहे अपूर्णावस्थेत असणे ही राज्य सरकारच्या निष्काळजीपणा, बेपर्वाई आणि नियोजन शून्यतेची पावती आहे... जनतेशी नाळ तुटलेले महाबेशरम आघाडी सरकार.'' सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना भारतात आपात्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. काल पुण्यातील सीरमने तयार केलेल्या लसींचे वितरण करण्यात आले.

