नाव घ्यायचं शिवसेनाप्रमुखांचे अन् काम करायचं राहुल गांधीसारखं...मुख्यमंत्र्यांना टोला - Politic BJP leader Atul Bhatkhalkar target Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

नाव घ्यायचं शिवसेनाप्रमुखांचे अन् काम करायचं राहुल गांधीसारखं...मुख्यमंत्र्यांना टोला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी टि्वट करून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी, यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर अनेक राजकीय नेते, संघटनांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केलं आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केले नाही, याबाबत भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी टि्वट करून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

 

आपल्या टि्वटमध्ये अतुल भातखळकर म्हणतात की, नाव घ्यायचं शिवसेनाप्रमुखांचे आणि काम करायचं राहुल गांधीसारखं. ही शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नीती. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिवस पण, मुख्यमंत्र्यांना श्रद्धांजलीचा एक ट्विट करावासा वाटला नाही. सत्तेसाठी तत्व सोडणाऱ्या लाचार मानसिकतेचा धिक्कार.

हेही वाचा : संजय राठोडांचे शक्तीप्रदर्शन चुकीचेच.. मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत...
 
रत्नागिरी : "संजय राठोड प्रकरणी चौकशीत दोषींवर नक्कीच कारवाई होईल. चौकशी पूर्ण झाल्यानंतर या संदर्भातील मुख्यमंत्री स्पष्टीकरण देतील. सर्वांना समान न्याय देण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे. पोहरादेवीवर केलले शक्तीप्रदर्शन कोरोना काळात करणे चुकीचे होते," असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. विदर्भात कोरोना वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी तिथे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी जमणे आणि जमवणे योग्य नाही, असा खुलासा शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी केला. रत्नागिरी दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी ते बोलत होते. 
 
राऊत म्हणाले, "या प्रकरणात कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. यातून कोणीही सुटणार नाही. 13 आँडिओ क्‍लिपची चौकशी करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यानुसार चौकशी होईल. संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्री नाराज आहेत, या प्रश्‍नावर बोलताना राऊत म्हणाले, याबाबत मला काही माहित नाही. संजय राठोड प्रकरणात महाविकास आघाडीमध्ये खदखद नाही. जो कोण चुकला असेल, त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत. संजय राठोड प्रकरणात भाजपचे आरोप चुकीचे आहेत. आरोप करण्यापलिकडे भाजपकडे काही उरले नाही. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख