अमृता फडणवीस रोहित पवारांना म्हणाल्या, "धन्यवाद भाऊ..."  - politic amruta fadnavis reply on ncp rohit pawar tweet about song kuni mhnale vedi | Politics Marathi News - Sarkarnama

अमृता फडणवीस रोहित पवारांना म्हणाल्या, "धन्यवाद भाऊ..." 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 मार्च 2021

आमदार रोहित पवार यांनी अमृता फडणवीस यांचे कौतुक केलं होतं.  

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं एक गाणं महिला दिनानिमित्त नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्याला अमृता फडणवीस यांनी रिप्लाय दिला आहे. याबाबतचे टि्वट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. 

महिला दिनी ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी..’ हे अमृता फडणवीस यांचं गाणं प्रदर्शित झाले. या गाण्याबाबत त्यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अमृता फडणवीस यांचे कौतुक केलं होतं.  

याबाबत रोहित पवार यांनी टि्वट करत अमृता फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या होत्या. पवार यांनी टि्वटमध्ये म्हटलं होते की, काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृताताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!

अमृता फडणवीस यांनी या गाण्याबाबत यापूर्वी माहिती दिली होती. त्या म्हणाल्या होत्या, “जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही! ‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत” असे म्हणतं अमृता यांनी ट्विट करून गाणं प्रदर्शित झाल्याची माहिती दिली होती. आमदार रोहित पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्याला "धन्यवाद भाऊ", असा रिप्लाय अमृता फडणवीस यांनी दिला आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख