पोलिस अधिकाऱ्याने चुकीच्या कारवाईबद्दल माफी मागितली, विषय संपला..

उलटे टांगीन या शब्द प्रयोगा बद्दल स्पष्टीकरण देतांना लोणीकर म्हणाले, ही दादा कोंडकेंची भाषा आहे, जशी वळवली तशी वळते. एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग आणला तर, त्याला दोरीने बांधून गुडघ्याव बसून सभागृहात माफी मागावी लागते. पण संबंधित पोलिस अधिकाऱ्याने मोर कुटुंबाची त्यांच्या घरी जाऊन हात जोडून चुकीच्या कारवाईबद्दल माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे.
Mla Babanrao lonikar press conference news parbhani
Mla Babanrao lonikar press conference news parbhani

परभणी ः  चुकीच्या माहितीवरून ओमप्रकाश मोर या प्रतिष्ठीत व्यापाऱ्याच्या घरात पन्नास पोलीस घेऊन प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी हसन गौहर यांनी धाड टाकली होती. कोर्टाच्या आदेशाशिवाय अशी कारवाई करण्याचा पोलिसांना अधिकार नाही. या कारवाईत पोलिसांना अवैध असे काहीच आढलले नाही, पण कारवाईने त्या कुटंबाची बदनामी झाली. त्यामुळेच मी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला होता. परंतु चुकीच्या कारवाईबद्दल गौहर यांनी मोर कुटुंबाची हात जोडून माफी मागितली आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने हा विषय आता संपला असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले.

एपीआय, आयपीएस अधिकारी यांच्यात परतुर येथील व्यापारी ओमप्रकाश मोर यांच्या घरावर टाकलेल्या धाडीवरून लोणीकर यांच्याशी फोनवरून झालेल्या संवादाची आॅडीओ क्लीप व्हायरल झाल्याने एकच चर्चा सुरू झाली होती. तुम्ही बिहारमधून आला असला, पण हा महाराष्ट्र आहे, इथे बिहारसारखी पोलीसांची गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही, असे बजावत लोणीकर यांनी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी हसन गौहर यांच्या विरोधात विधानसभेत आवाज उठवण्याचा इशारा दिला होता. तसेच एपीआय यांच्याशी झालेल्या संवादाच्या आॅडीओ क्लीपमध्ये लोणीकर यांनी विधानसभेत उलटे टांगील अशी धमकी दिल्याचे देखील समोर आले होते.

या आॅडिओ क्लीपची आज राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. परंतु आता लोणीकर यांनी या प्रकरणावर पडदा टाकला असून हा विषय संपल्याचे परभणी येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. उलटे टांगीन या शब्द प्रयोगा बद्दल स्पष्टीकरण देतांना लोणीकर म्हणाले, ही दादा कोंडकेंची भाषा आहे, जशी वळवली तशी वळते. एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग आणला तर, त्याला दोरीने बांधून गुडघ्याव बसून सभागृहात माफी मागावी लागते. पण संबंधित पोलिस अधिकाऱ्याने मोर कुटुंबाची त्यांच्या घरी जाऊन हात जोडून चुकीच्या कारवाईबद्दल माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसे त्यांनी मला देखील सांगितले असून त्यांना माफ करावे अशी विनंती केली आहे.

पोलिस अधिक्षकांचे देखील माझ्याशी बोलने झाले असून यापुढे अशा प्रकारची चुकीची कारवाई कुणारवही होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, ्असा शब्द मला दिला आहे. प्रशिक्षणार्थी अधिकारी आहे, पहिलीच पो्स्टींग असल्यामुळे असा चुकीचा प्रकार घडला. आता त्यांनी माफी मागितल्यामुळे हा विषय संपला आहे. भ्रष्ट आणि चुकीचे का्म करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आपण यापुढे देखील आवाज उठवतच राहू, ते आमचे कामच आहे. जनतेने त्यासाठी आम्हाला निवडून दिल्याचेही लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com