Police arrested for threatening higher education minister | Sarkarnama

उच्चशिक्षणमंत्र्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

 उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांना धमकी देणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अमरावती : उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांना धमकी देणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि त्यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी उदय सामंत हे राज्यभरातील विविध विद्यापीठांचा दौरा करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते अमरावती येथे होते. 

याठिकाणी त्यांच्या विरोधात एका विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधीनी गोंधळ घालून निदर्शने करण्याची तयारी केली होती. ही माहिती पोलिस यंत्रणेने त्यांना दिल्याने सामंत यांनी या विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत भेटण्याची वेळ नाकारली होती. यामुळे या संघटनेच्या एका प्रतिनिधीकडून 'तुम्ही अमरावतीहून नागपूरला कसे जातात पाहूनच घेऊ,' अशा पद्धतीची धमकी फोनवरून त्यांच्या पीएला देण्यात आली होती. 

या प्रकरणी अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करून एका विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधीला ताब्यात घेतले. आहे. त्याच्या विरुद्ध कलम १५१ आणि ५०६ अन्वये कारवाई करण्यात आली असल्याची माहिती फ्रेझरपुरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षकांनी दिली आहे.

नगरमध्ये अधिकारी, पदाधिकारी, आरोग्यदुतांनी अशी केली प्रतिज्ञा
नगर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या  'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेस आज जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली. या वेळी उपस्थित पदाधिकारी, अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आरोग्यदुतांनी कोरोनाचे नियम पालन करणे व इतरांना प्रेरीत करण्याबाबत प्रतिज्ञा केली.'कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मी स्वतः माझ्या कुटुंबात, परिसरात लोकांना मास्क लावणे, आपापसात दोन मीटरचे अंतर ठेवणे, साबणाने वारंवार हात धुणे या सर्व गोष्टींसाठी प्रेरित करेन. कोरोनाच्या काळात कोणाशीही दुर्व्यवहार अथवा भेदभाव न करता सर्वांशी आपुलकीने आणि सद्भावाने वागेन. कोरोनाच्या लढाईत आपली ढाल म्हणून उभे असलेले डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी, सर्व कार्यकर्ते यांचा मी सन्मान व समर्थन करेन व त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेन,' अशी प्रतिज्ञा देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या टाकळी खातगाव येथे या मोहिमेचा प्रारंभ झाला. या वेळी उपाध्यक्ष प्रताप शेळके, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, तहसीलदार उमेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मांडगे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि अधिकारी आदी सर्व उपस्थितांना ही प्रतिज्ञा देण्यात आली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख