परभणीत नाही तर नांदेडमध्ये पेट्रोल राज्यात सर्वाधिक दराने

डिझेलही शंभरी ओलांडण्याची शक्यता..
परभणीत नाही तर नांदेडमध्ये पेट्रोल राज्यात सर्वाधिक दराने
petrol rates

मुंबई : गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या इंधन दरवाढीमुळे देशभरात पहिल्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दराची ऐतिहासिक नोंद झाली आहे. ऐन महामारीच्या काळात अद्याप दरवाढ सुरूच आहे. मुंबईत आज दर स्थिर असूनही पेट्रोल १०३.८९ रुपये, तर डिझेल ९५.७९ रुपये प्रतिलिटर दराने विक्री करण्यात येत होते. या महिन्यात २५ दिवसांमध्येच पेट्रोल ३.७२, तर डिझेल ३.१ रुपयांनी वाढ झाली आहे. राज्यात परभणीचा पेट्रोल दरात विक्रम असतो. मात्र नांदेडने परभणीलाही यात मागे टाकले आहे. (Nanded records highest petrol rates in Maharashtra) 

दरवाढीची परिस्थिती देशभरात सारखीच असून, महाराष्ट्रात त्याचा सर्वाधिक फटका दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यात पेट्रोल १०६.२१; तर बीड, हिंगोली, जालना, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत १०५ तर अमरावती, औरंगाबाद, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, मुंबई उपनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, सातारा, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये १०४ रुपयांपेक्षा जास्त प्रतिलिटर पेट्रोलचे दर आहेत, तर इतर ठिकाणी १०३ रुपयांच्या दरम्यान दरांची नोंद झाली आहे.


डिझेल दरवाढीसंदर्भातही सारखीच परिस्थिती असून, पहिल्यांदा डिझेल ९५ रुपये पार गेले असून, भविष्यात इंधन दरवाढ कायम राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहे. डिझेलही शंभरी पार करण्याची शक्यता आहे.

मुंबईत इंधनाचा भडका
मुंबई- पेट्रोल- १०३.८९, डिझेल- ९५.६९, चंदीगड- पेट्रोल- ९४.२, डिझेल- ८७.९४, बंगळुरु- पेट्रोल- १०१.३, डिझेल- ९३.६१, दिल्ली- पेट्रोल- ९७.७६, डिझेल- ८८.३०, चेन्नई- पेट्रोल, ९८.८८, डिझेल- ९२.९८, कोलकाता- पेट्रोल- ९७.६३, डिझेल- ९१.१५, पटना- पेट्रोल- ९९.८०, डिझेल- ९३.६३, रायपूर- पेट्रोल ९५.९०, डिझेल- ९५.५०, पणजी- पेट्रोल- ९५.५९, डिझेल- ९३.२०, रांची- पेट्रोल- ९३.५५, डिझेल- ९३.२०.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in