महाविकास आघाडीला जनता वैतागली, पदवीधर निवडणुकीनंतर राज्यात सत्तापालट.. - People are annoyed with Mahavikas Aghadi, change of power in the state after graduate elections | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

महाविकास आघाडीला जनता वैतागली, पदवीधर निवडणुकीनंतर राज्यात सत्तापालट..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

राज्यातील जनता यांच्या वर्षभरातील कारभालाच कंटाळली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश या शिवाय गुजरात व देशातील अन्य राज्यात ज्या पोटनिवडणुका झाल्या त्यामध्ये देखील जनतेची पसंती भाजपलाच आल्याचे सिद्ध झाले आहे. राज्यातील पदवीधर निवडणुकीत देखील हेच चित्र कायम राहील, असा दावा दरेकर यांनी केला.

औरंगाबाद ः कुणाचा पायपोस कुणाला नाही, सरकारमध्ये समन्वय नाही, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला जनता वर्षभरातच वैतागली आहे. पदवीधरची निवडणूक झाल्यानंतर राज्यात सत्तापालट होणार असल्याचा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी परतूर येथील भाजपच्या ्मेळाव्यात बोलतांना केला. बिहारसह देशातील इतर राज्यात झालेल्या पोटनिवडणूकीचे निकाल भाजपच्या बाजूने लागले आहेत. हाच ट्रेंड पदवीधर निवडणुकीत देखील दिसून येईल आणि भाजप पाचही जागा जिंकेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

भाजपचे मराठवाडा पदवीधरचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ दरेकर यांच्या उपस्थितीत परतूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तत्पुर्वी दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टिका करतांनाच पदवीधर निवडणुकीनंतर राज्या सत्तापालट होऊन पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचे विधान केले.

दरेकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे कुठल्याही निर्णयावर हे सरकार ठाम नसल्याचे दिसून येत आहे. वीज बिलांच्या बाबतीत प्रामुख्याने हे दिसून आले आहे. आधी विज बील माफ करणार सांगितले आणि आता सगळे बील वसुल करण्याची भूमिका घेतली. कोरोनाच्या काळात जनतेला अव्वाच्या सव्वा वीज बीलांचा शाॅक देत सरकारने जखमेवर मीठ चोळले. माफी देण्याचा शब्दही फिरवला, त्यामुळे हे लबाड आणि अस्थिर सरकार आहे.

राज्यातील जनता यांच्या वर्षभरातील कारभालाच कंटाळली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश या शिवाय गुजरात व देशातील अन्य राज्यात ज्या पोटनिवडणुका झाल्या त्यामध्ये देखील जनतेची पसंती भाजपलाच आल्याचे सिद्ध झाले आहे. राज्यातील पदवीधर निवडणुकीत देखील हेच चित्र कायम राहील, असा दावा दरेकर यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख