Padalkar's statement was considered wrong by his own leaders. | Sarkarnama

गोपीचंद पडळकरांकडे दुर्लक्ष करा...

सागर आव्हाड 
गुरुवार, 25 जून 2020

गोपीचंद पडळकर यांचे हे राजकीय स्टेटमेंट होतं. त्यांच विधान त्यांच्याच नेत्यांना चुकीचं वाटलं. पवार साहेब जनतेच्या हृदयात बसले आहे. गेल्या 55 वर्षपासून ते सामाजिक काम आहे. पडळकरांचं वय नाही. 

पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांना राज्य ढवळून निघालं. राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतलाय. तर गोपीचंद पडळकर यांच्या आरोपावर बोलताना 
गोपीचंद पडळकर यांचे हे राजकीय स्टेटमेंट होतं. त्यांच विधान त्यांच्याच नेत्यांना चुकीचं वाटलं. पवार साहेब जनतेच्या हृदयात बसले आहे. गेल्या 55 वर्षपासून ते सामाजिक काम आहे. पडळकरांचं वय नाही, तेवढे दिवस पवार साहेब समाज हितच काम करत आहे. त्यामुळं अशा मोठ्या लोकांच्या विरोधात बोलल्यावर आपली राजकीय पोळी भाजेल.  टीव्हीवर आणि पेपरमध्ये येऊ असं काहींना वाटतं आहेत. 

त्यामुळं ते खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. माञ, आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. गोपीचंद चुकले हे त्यांच्या नेत्यांनी दाखवून दिल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. पवार साहेबांवरील वक्तव्यानं दुःख नक्कीच वाटणार. चीड नक्कीच येते, असही रोहित पवारांनी म्हटलं. अशा खालच्या पातळीचं राजकारण युवकांना चालणार नाही. आम्हाला सकारात्मक, राजकारण जनतेच्या हिताचे राजकारण करायचं आहे. धोरणात्मक निर्णयवर बोला. आम्ही त्याचे स्वागत करु. 

काहीजण युवापिढीचा राजकीय फायदा घेतात आणि राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. गोपीचंद पडळकर हे दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत. त्यांचे नेते त्यांना जे काय बोलायचे ते बोलले. त्यामुळं त्यांच्यावर पुन्हा बोलून मी लोकांचा वेळ घेणार नाही.  कार्यकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. तुमचं मन दुखावल असेल तरी खालच्या पातळीवर राजकारण करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करावे, असं आवाहन रोहित पवार यांनी केलंय. त्यांच्या बरोबर बातचीत केली आहे. 

 

हेही वाचा ...तुमच्यात हिम्मत असेल, तर फोन उचला ; राष्ट्रवादीचे पडळकरांना आवाहन

पुणे : राष्ट्रवादीचे कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पडळकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यातपुण्यातील राष्ट्रवादीचे खंदे समर्थक अंकुश काकडे मागे राहतील ते कसले. 'अरे गोपी तुझ्यात हिम्मत असेल तर तू फक्त फोन घे,'  अशी साद देत खुले आवाहन काकडे यांनी समाज माध्यमाद्वारे पडळकर यांना केलं आहे
. या आवाहनाला नेटकऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.   काकडे यांनी  'गोपी तुझ्यात हिंमत असेल तर फोन घे ' असे आवाहान केले आहे. यावर नेटकऱ्यांच्या अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.  'अण्णा बोलू द्या, त्यांना, तेच तर काँग्रेस, राष्ट्रवादीची मशागत करीत आहेत. महाराष्ट्राला त्यांचे रूप कळू द्या.. हा महाराष्ट्र त्यांना योग्य वेळी धडा शिकवेल, असे एका नेटकऱ्यांने आपले मत व्यक्त केले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख