तेजस्वी यादव यांनी शेअर केला नरेंद्र मोदींचा जुना व्हिडिओ... - Opposition leader Tejaswi Yadav has viralized an old video of Narendra Modi about Chief Minister Nitish Kumar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

तेजस्वी यादव यांनी शेअर केला नरेंद्र मोदींचा जुना व्हिडिओ...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव यांनी नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविषयीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. नितीश कुमार यांच्यावर या व्हिडिओमध्ये मोदींनी भष्ट्राचाराऱ्याचे आरोप लावले आहेत. 

पाटना : बिहार निवडणुकामध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार प्रचारसभा आहेत. विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव यांनी नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविषयीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. नितीश कुमार यांच्यावर या व्हिडिओमध्ये मोदींनी भष्ट्राचाराऱ्याचे आरोप लावले आहेत. 

याबाबत तेजस्वी यादव यांनी टि्वट करीत नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे. तेजस्वी यादव आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की आदरणीय नितीशकुमार यांच्या कार्यकाळात आतापर्यंत 30 हजार कोटींचे 60 मोठे गैरव्यवहार झाले आहेत. यातील 33 गैरव्यवहार नरेंद्र मोदी पाच वर्षपूर्वी मोजत होते. सृजन गैरव्यवहार, धान्य गैरव्यवहार, शैाचालय गैरव्यवहार, शिष्यवृत्ती गैरव्यवहार आदी हजारों गैरव्यवहार आहेत. 
  
आयकर विभागाने काल बिहारमध्ये अनेक ठिकाणी छापा टाकला. यात अऩेक व्यापाऱ्यांवकडे बेकायदा रक्कम आढळली आहे. सरकारच्या जलनल योजनेबाबत महत्वपूर्ण कागदपत्र आढळली आहेत. यामुळे विरोधकांना या मुद्दा मिळाल्याने विरोधक आक्रमण झाले आहेत. लोकशक्ती जनशक्तीपार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान म्हणाले की आमची सत्ता स्थापन झाल्यानंतर या गैरव्यवहाराबाबात चैाकशी करण्यात येईल.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा नालंदा जिल्हा आता त्यांची डोकेदुखी वाढवू लागला आहे. येथील राजगीर विधानसभा मतदारसंघातील नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) विद्यमान आमदार रवी ज्योती यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. पूर्वी पोलीस दलात एन्काउंटर स्पेशालिस्ट असलेले ज्योती आता काँग्रेसकडून उभे आहेत. त्यांनी थेट नितीशकुमारांवर हल्लाबोल केला आहे. 

रवी ज्योती यांच्यासमोर भाजप नेते व हरियानाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांचे पुत्र कौशल किशोर यांना जेडीयूने उभे केले आहे. काही दिवसांपूर्वी नितीशकुमार यांनी रवी ज्योती यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. ते जेथून आले आहेत, तेथेच त्यांना परत पाठवू, असे नितीशकुमार म्हणाले होते. या विधानावरुन बरात गदारोळ उडाला होता. याला रवी ज्योती यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाआघाडीची लाट बिहारमध्ये आली आहे. ही लाट बघून मुख्यमंत्री नितीशकुमारांचे मानसिक संतुलन बिघडले आहेत. 

ज्योती हे पोलीस निरीक्षक होते. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांचा मोठा दबदबा होता. मागील विधानसभा निवडणुकीत ते जायंट किलर ठरले होते. राजगीर मतदारसंघात सहा वेळा निवडून आलेल्या भाजपच्या सत्यदेव नारायण आर्य यांना ज्योतींनी पराभवाची धूळ चारली होती. आता आर्य यांचे पुत्र कौशल किशोर मैदानात आहेत. या वेळी ज्योती काँग्रेसकडून रिंगणात उतरले आहेत. ज्योती हे मागील विजयाची पुनरावृत्ती करतात की कौशल किशोर हे पित्याच्या पराभवाचा वचपा काढतात याची उत्सुकता आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. यातील पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख