प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय उशिराने सुचलेले शहाणपण...दरेकरांची टीका - Opposition leader Pravin Darekar criticizes Chief Minister Uddhav Thackeray's decision | Politics Marathi News - Sarkarnama

प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय उशिराने सुचलेले शहाणपण...दरेकरांची टीका

सरकारनामा ब्युरो
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला निर्णय म्हणजे सरकारला उशिराने सुचलेले शहाणपण असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. 

मुंबई : राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला निर्णय म्हणजे सरकारला उशिराने सुचलेले शहाणपण असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. 

महाराष्ट्रातील लाखो वारकरी, हिंदुत्वप्रेमी जनता, मंदिरावर उपजिविका अवलंबून असणा-यांची ही मागणी होती. त्यांचा रेटा व दबाव सरकारवर होता, त्यामुळेच उशिरा को होईना सरकारला निर्णय घ्यावा लागला. त्याचे स्वागत आहे पण हा निर्णय अगोदरच व्हायला हवा होता. मंडई, मॉल्स, रेस्टॉरन्टस, बार, जीम्स, व अन्य सार्वजनिक स्थळे खुली केली होती. वारकरी सांप्रदायाने अतिशय जिव्हाळ्याने मंदिरे उघडण्याची भूमिका मांडली होती, त्यामुळे सरकारने आधीच हा निर्णय घेणे अपेक्षित होते. पण केवळ अहंकार व प्रतिष्ठेमुळे सरकारने हा निर्णय घेतला नाही. कोरोनाचे संकट असताना मंदिरे उघडल्यामुळे जनतेला दिलासा मिळेल, त्यामुळे जनेतेने सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केली आहे.

धार्मिक स्थळे उघडण्याच्या निर्णय शंकास्पद...   
सध्या दिवाळी सुरु असून काल राज्यात 4 हजारावर कोरोना रुग्ण आढळले आहेत. अनेक सार्वजनिक ठिकाणी लोक गर्दी करीत आहेत. कुठे कोरोना संबंधी नियम पाळले जात आहेत, कुठे नाही. त्यामुळे तज्ज्ञांनी येणाऱ्या काळात कोरोनाची दूसरी लाट येण्याचे शक्यता वर्तविली आहे. 

कोरोना लाट येण्याची शक्यता असताना काल ठाकरे सरकार ने सोमवारपासून राज्यातील धार्मिक स्थळ सर्वांसाठी उघण्याची घोषणा केली आहे. पण या निर्णयावरच खर तर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. आगामी येणारी कोरोनाची दूसरी लाट ही मंदिरे किंवा धार्मिक स्थळ उघडल्यामुळे आली असं खापर मग मंदिरातील गर्दीमुळे सरकार फोडून मोकळे होईल. परत लोकडाउन सुरु होऊन सर्वस्वी धार्मिक स्थळ जवाबदार असल्याचं भासवून आपली जबाबदारी झटकुन सरकार मोकळ होईल, म्हणून आम्हाला सरकारच्या या निर्णयावर शंका वाटत आहे, असे स्वाभिमान संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले. 

प्रार्थनास्थळे खुली केल्यानंतर सर्वांना नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा आणि स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका, असे काही नियम यात नमूद करण्यात आले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख