विरोधी पक्षाच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा हे एकमेव हत्यार 

तुम्हीकेंद्रीय तपासयंत्रणांची पथकच्या पथक बोलवाआम्हीलढू
124sanjay_raut_6may_2f_0_0.jpg
124sanjay_raut_6may_2f_0_0.jpg

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, आमदारांना खोट्या गुन्ह्यात अडकवत आहेत, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ''केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयचा वापर करीत आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर सत्यावर हल्ला करण्यासाठी केला जात आहे,'' असेही राऊत म्हणाले. only weapon in hands of opposition in maharashtra to fight the state government  

संजय राऊत म्हणाले, ''राजकारणात नवे  पायंडे  पाडले जातात . तुम्ही  जी  हत्यार  वापरताहेत ती  तुमच्या  विरोधात  हि  उलटू  शकतात. विद्यमान सरकारने याचा  विचार करावा. तुम्ही  काँग्रेसला दोषी  ठरवत  होता.  तुम्ही  याच  मार्गाचा  अवलंब  करताहेत. महाराष्ट्रचं  सरकार अस्थिर  होईल अशा  भ्रमात  राहू  नये. आमच्या मंत्र्यांना, आमदारांना  खोट्या  गुन्ह्यात अडकविण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे.  राज्य  चालवणं म्हणत नाहीत. तुम्ही  केंद्रीय तपास  यंत्रणांची पथकच्या पथक बोलवा  आम्ही  लढू''

“महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा हे एकमेव हत्यार आहे. आरोप खोटे, बनावट असतील तर त्याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा मजबूत आणि निष्पक्ष आहे. केंद्रात भाजपाचं सरकार असल्याने केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रातील मंत्री, आमदारांना त्रास देणं हीच एक ताकद त्यांच्या हातात आहे. कितीही खोटं करण्याचा प्रयत्न केला तरी उघड होणारच. असत्य तरंगून शेवटी वर येतं. या सर्वांशी लढण्यासाठी आता एक पाऊल पुढे टाकावं लागेल,” असे संजय राऊत म्हणाले.  

विधानसभा अध्यक्षांची निवडणुकीबाबत राऊत म्हणाले की, राज्यात सरकारची स्थापना झाली त्यावेळी 170चं बहुमत आमच्याकडे होतं. पण दुर्दैवानं आमचे दोन आमदार कमी झाले आहेत. तसेच पंढरपूर पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. तरीही 170 चा आकडा कायम राहिल, याची आम्हाला खात्री आहे.''

मुंबईत ठाण मांडून बसलेल्या ७२७ पोलिस अधिकाऱ्यांना दिलासा
मुंबई : आठ वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत पोलिस अधिका-यांच्या आंतरजिल्हा बदली थांबवली. मुंबईतील 727 अधिका-यांची यादी तयार करण्यात आली होती. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात पोलिस खात्याचे बदनामी झाल्यानतंर आता आठ वर्षांहून अधिक कालावधी मुंबई शहरात काढणा-या पोलिसांची आंतरजिल्हा बदली करण्यात येणार होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com