फक्त मुख्यमंत्र्यांनाच इज्जत आहे? राज्यपाल, पंतप्रधान यांची इज्जत चिंध्या आहे काय?

फडणवीस यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली.
devendra-phadanvi-1.jpg
devendra-phadanvi-1.jpg

मुंबई : कल्याणच्या सभेत एकदा बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पोलिसांचा अपमान केल्याची आठवण विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस यांनी करून दिली. हे पोलिस भांडी घासायच्या लायकीचे आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी पोलिसांचा अवमान केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इज्जत आहे आणि पंतप्रधान आणि राज्यपालांना इज्जत नाही का, त्यांची इज्जत म्हणजे चिंध्या आहेत का, असा सवाल त्यांनी केला.

विधानसभेत बोलताना फडणवीस यांनी जोरदार प्रहार केले. कोरोनाकाळात सरकार कसे कुचकामी ठरले, यावर त्यांनी सडेतोड भाषण केले. ते म्हणाले की कंगना रानावतने मुंबई पोलिसांचा अपमान केला हे मान्य आहे. आम्ही त्याचा निषेध केला. मात्र जेव्हा आपलेच नेते पोलिसांचा अपमान करत होते तेव्हा त्यांनी कोणी सवाल विचारला का? कल्याणच्या सभेत ठाकरे यांनी बोलताना हे पोलिस भांडी घासायच्या लायकीचे असल्याचे कसे काय बोलले? मात्र मनाला येईल त्याप्रमाणे बोलण्याचे स्वातंत्र्य आपल्यालाच आहे, असे कसे, असा सवाल त्यांन केला.  

एखाद्या माध्यमाने विरोधात बातमी दिली तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे या सरकारचे धोरण आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून राज्यपाल आणि पंतप्रधान यांच्याबद्दल जी भाषा वापरली जाते ती किती खालच्या पातळीवरची आहे, याचा कधी छगन भुजबळ तुम्ही विचार करणार की नाही, असे विचारत मुख्यमंत्र्यांनाच इज्जत आहे का आणि बाकिच्यांची इज्जत म्हणजे चिंध्या का, असे त्यांनी विचारले.

गृह खात्याबद्दल फडणवीस यांनी जोरदार बॅटिंग केली. कोविड सेंटरमध्ये अनेक महिलांवर अत्याचार झाले. त्यावर गृहमंत्री काय बोलणार? महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी दिशा कायदा हे सरकार आणणारे होते. त्याचे काय झाले? दिशा कायद्याची कॅबिनेटमध्ये दिशा कशी बदलली हे मला माहीत आहे.  अजितदादा तुम्ही मास्क घालून हसता. पण ते आम्हाला कळतंय, असा टोला त्यांनी मारला. दूधदर वाढविण्याबाबत आम्ही आंदोलन केले. शेतकरी संघटनेचने राजू शेट्टी यांनी आंदोलन केले. आमचे जाऊद्या किमान त्यांच्या आंदोलनाची दखल घ्या. ते तुमच्या सोबत आहेत की नाही, हे मला माहीत नाही, असाही चिमटा त्यांनी काढला. 

कोरोनाच्या परिस्थितीत मुंबई आणि पुण्याकडे लक्ष दिलं जाते. मात्र नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर ही महाराष्ट्रात आहे.
 मुख्यमंत्री हे मुंबई पाहतात आणि उपमुख्यमंत्री हे पुणेम मग इतर शहरांकडे कोण पाहणार  आढावा का घेतला जात नाही? पैसे का दिले जात नाही? तुमचं राज्य हे फक्त मुंबई आणि पुणे मर्यादित आहे का, अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com