पुण्यापाठोपाठ कोरोना वाढतोय सांगलीत..पुणे विभागात मृतांचा आकडा नऊ हजारांवर...  - The number of deaths in Pune division is increasing to nine in Sangli  | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यापाठोपाठ कोरोना वाढतोय सांगलीत..पुणे विभागात मृतांचा आकडा नऊ हजारांवर... 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 27 हजार 363 रुग्णांपैकी 17 हजार 777 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 803 आहे.

पुणे : पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात कोरोना बळींचा आकडा नऊ हजार २८२ झाला आहे. २.५९ इतका मृत्यू दर आहे. समाधानाची बाब म्हणजे पाचही जिल्ह्यात बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण ७५.४८ टक्के इतके आहे.

पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 733 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 705 झाली आहे. अॅक्टीव रुग्ण संख्या 78 हजार 690 इतकी आहे. पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 40 हजार 423 रुग्णांपैकी 1 लाख 92 हजार 771 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 312 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 340 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.22 टक्के इतके आहे. तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 80.18 टक्के आहे.

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 27 हजार 363 रुग्णांपैकी 17 हजार 777 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 803 आहे. कोरोनाबाधित एकूण 783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 27 हजार 21 रुग्णांपैकी 18 हजार 632 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 396 आहे. कोरोनाबाधित एकूण 993 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 26 हजार 681 रुग्णांपैकी 16 हजार 191 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 486 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 37 हजार 217 रुग्णांपैकी 25 हजार 362 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 693 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 162 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गुरूवारच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये शुक्रवारी एकूण 7 हजार 859 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ४ हजार 571, सातारा जिल्ह्यात 915, सोलापूर जिल्ह्यात 631, सांगली जिल्ह्यात 1 हजार 28 तर कोल्हापूर जिल्ह्यात 714 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
पुणे विभागामध्ये एकुण 15 लाख 73 हजार 157 नमून्यांची तपासणी अहवाल प्राप्त झाला. १७ सप्टेबरपर्यंतच्या प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 58 हजार 705 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख