राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पोचला दोन लाख 12 हजारांवर 

राज्यात कोव्हिड-19 प्रादुर्भावाचा जोर वाढला असून, सोमवारी (ता. 6 जुलै) दिवसभरात 5368 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाख 11 हजार 987 झाली आहे. आणखी 204 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 9026 वर पोचला आहे.
The number of corona positive patients in the state has reached two lakh 12 thousand
The number of corona positive patients in the state has reached two lakh 12 thousand

मुंबई : राज्यात कोव्हिड-19 प्रादुर्भावाचा जोर वाढला असून, सोमवारी (ता. 6 जुलै) दिवसभरात 5368 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाख 11 हजार 987 झाली आहे. आणखी 204 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 9026 वर पोचला आहे. राज्यात एकूण 86,040 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

सोमवारी राज्यात एकूण 204 कोरोनाबळींची नोंद झाली. त्यापैकी मुंबईत 39, ठाणे जिल्ह्यात 75, पुणे मंडळात 28, औरंगाबाद मंडळात 12, नाशिक मंडळात 39, कोल्हापूर मंडळात दोन, लातूर मंडळात चार, अकोला मंडळात चार, नागपूर मंडळात एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.26 टक्के आहे. आतापर्यंत 11 लाख 35 हजार 447 रुग्णांच्या नमुन्यांपैकी दोन लाख 11 हजार 987 म्हणजे 18.67 टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात सहा लाख 15 हजार 265 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आणि 46 हजार 355 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

एक लाखाहून अधिक कोरोनामुक्त 

कोरोनाचे 3522 रुग्ण बरे होऊन सोमवारी घरी परत गेले. राज्यात आतापर्यंत एक लाख 15 हजार 262 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.37 टक्के झाले आहे. 

मुंबईत 1201 नवीन रुग्ण 

मुंबई शहरात सोमवारी (ता. 6 जुलै) 1 हजार 201 नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण रुग्णसंख्या 85 हजार 326 इतकी झाली आहे. तसेच 39 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 4 हजार 935 वर पोचला आहे. यासोबतच 1 हजार 269 रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत. 

मुंबईत नव्याने नोंद झालेल्या 39 मृत्यूंपैकी 32 जणांना दीर्घकालीन आजार होते. यात 23 पुरुषांचा, तर 16 महिलांचा समावेश होता. मृत झालेल्या रुग्णांपैकी दोघांचे वय 40 च्या खाली होते. 22 रुग्ण हे 60 वर्षांवरील होते, तर 15 रुग्ण हे 40 ते 60 वयाच्या दरम्यान होते. मुंबई संशयित रुग्णांचे आढळणे सुरूच असून मंगळवारी देखील 762 नवीन संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 59 हजार 181 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, 1 हजार 269 जण कोरोनामुक्त झाल्याने एकूण बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या 57 हजार 152 वर पोचल्याने कोरोनामुक्त रुग्णांचा दर 67 टक्के झाला आहे. 

दरम्यान, 5 जुलैपर्यंत 3 लाख 59 हजार 159 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहे. 29 जून ते 5 जुलैदरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 1.60 टक्के इतका आहे. त्यामुळे रुग्णदुपटीचा दर हा 44 दिवसांवर गेला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com