आता पंकजा मुंडेही म्हणाल्या, स्थगिती सरकारला स्थगिती देऊन `आम्ही पुन्हा येऊ`..

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे खऱ्या अर्थाने तिन तिघाडी व काम बिघाडी असे सरकार आहे. मागील वर्षभरात या सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. भाजपच्या सरकारने घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयास स्थगिती देणे हाच एककलमी कार्यक्रम या महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात राबवला.
Bjp Leader pankaja munde news parbhani
Bjp Leader pankaja munde news parbhani

परभणी ः भाजप सरकारने घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयाना स्थगिती देणारे हे महाविकास आघाडीचे सरकार नव्हे तर स्थगिती सरकार आहे. या स्थगिती सरकारला  स्थगिती देवून परत आम्ही येवू, असा दावा करत मराठवाडा पदविधर मतदारसंघाची निवडणुक म्हणजे सरकार स्थापनेची मुहूर्तमेढ ठरणार आहे, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.परभणीत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ पदविधरांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा  घेण्यात आला. 

यावेळी मार्गदर्शन करतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे खऱ्या अर्थाने तिन तिघाडी व काम बिघाडी असे सरकार आहे. मागील वर्षभरात या सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. भाजपच्या सरकारने घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयास स्थगिती देणे हाच एककलमी कार्यक्रम या महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात राबवला.

पदविधर मतदारसंघातील निवडणूक ही क्रांतीकारी ठरणार आहे. केवळ जातीपातीचे घाणेरडे राजकारण केले जात आहे, पण या राजकारणाला आता कुणीही बळी पडणार नाही. ही निवडणुक सत्तातंर घडविणारी निवडणुक आहे. त्यामुळे शिरीष बोराळकर यांना विजयी करा, असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केले.

आजारपणावरूनही राजकारण होईल..

पंकजा मुंडे भाषणाला उपस्थित राहण्या आगोदर त्यांच्या अंगरक्षकाने त्या बोलणार असणाऱ्या माईकवर सॅनिटायझरचा स्प्रे मारला. हा मुद्दा पकडून पंकजा मुंढे म्हणाल्या, आधीच माझ्या बद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत. मी विरोधकांना मदत करत असल्याचा आरोप ही केला जातो आहे. अश्यात जर मी आजारी पडले तर त्याचे ही राजकारण केले जाईल. यासाठी मी ही काळजी घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार अ‍ॅड. विजय गव्हाणे, मोहन फड, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, किशोर कोंडगे, प्रवीण घुगे, इद्रीस मुलतानी, माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद वाकोडकर, मोहन कुलकर्णी, रामप्रभू मुंडे, विठ्ठलराव रबदडे, अ‍ॅड. व्यंकटराव तांदळे, रामकिशन रौंदळे, अजय गव्हाणे, बाळासाहेब भालेराव, संजय रिझवाणी, मधुकर गव्हाणे, राजेश देशपांडे, एन.डी. देशमुख, डॉ. राजेंद्र चौधरी, समीर दुधगावकर आदी उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com