खडसे जाण्याचे दुःख; पण भाजपमध्ये नवे चेहरे तयार होत आहेत... : महाजनांचा दावा - now more challenges before Girish Mahajan after kahdse quits BJP | Politics Marathi News - Sarkarnama

खडसे जाण्याचे दुःख; पण भाजपमध्ये नवे चेहरे तयार होत आहेत... : महाजनांचा दावा

कैलास शिंदे
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

भाजपची सत्तास्थाने राखण्यासाठी प्रयत्न 

जळगाव : भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपला बळ देण्याची जबाबदारी आता आमदार गिरीश महाजन यांच्यासमोर आली आहे. हे त्यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन हे एकेकाळचे खडसे यांचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत जिल्ह्यात पक्ष वाढविण्याचे कार्य महाजन यांनी केले. महाजन हे खडसे यांना नेतेच मानतात. मात्र खडसेंच्या पक्षांतर करण्यामुळे दोन्ही नेत्यांचा आता खरा आमना-सामना होणार आहे.       

जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष वाढविण्याचे कार्य खडसे यांनी केले. हे  निर्विवाद सत्य आहे. त्यांनी  जिल्हा परिषदेवर असलेली काँग्रेसची सत्ता खालसा करून गेली तीस वर्षे भाजप सत्ता राखली आहे. या शिवाय भुसावळ, फैजपूर, सावदा नगरपालिकेवर भाजपची सत्ता स्थापन केली आहे.

सहकारातही त्यांनी जिल्हा बँक, दूध विकास संघ यावर भाजप चे वर्चस्व प्रस्थापित केले. जिल्ह्यात भाजपचे दोन खासदार आहेत. त्यामुळे आज भाजप या ठिकाणी बळकट आहे. मात्र आता खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशामुळे भाजप पुढे मोठे आव्हान असणार आहेत आहे. विशेषत; आमदार गिरीश महाजन यांच्या समोर आता खरे आव्हान उभे राहिले आहे. खडसे यांचे कडवे आव्हान स्वीकारून भाजपची सत्तास्थाने टिकवून ठेवून पक्ष बळकट करण्याचे त्यांच्या समोर आव्हान असून आता त्यांची खरी परीक्षा असणार आहे.

खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल बोलताना ते म्हणाले की त्यांच्या भाजप सोडून जाण्याने भाजपचे नुकसान झालेले आहे. मात्र त्यांनी आता राजीनामा दिला आहे. हे आता आपल्याला स्वीकारावे लागेल. भारतीय जनता पार्टी मध्ये नवीन चेहरे आता उदयास येत आहेत. त्यामुळे पक्षाला आणखी चांगले चेहरे मिळणार आहेत. नाथाभाऊंची हर एक प्रकारे आम्ही समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी मान्य नाही. भाजपा हा कार्यकर्त्यांच्या विश्वासावर चालणारा पक्ष आहे. खडसे जाण्याने थोडे दिवस दुःख होईल. पण त्याला पर्याय नाही.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख