आता मी तुमचाच; द्याल ती जबादारी पार पाडीन, राष्ट्रवादी बळकट करीन.. - Now I will fulfill your, say jaisingrao Gaikwad | Politics Marathi News - Sarkarnama

आता मी तुमचाच; द्याल ती जबादारी पार पाडीन, राष्ट्रवादी बळकट करीन..

जगदीश पानसरे
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

माझ्या आधी एकनाथ खडसे आले, आता माझा प्रवेश झाला, यापुढे ही रांग अशीच वाढत जाणार आहे. माझ्यावर तुम्हाला पक्षाने खूप दिले तरी पक्ष सोडल्याचा आरोप केला जातो. पण १८ वर्ष मी पक्षासाठी झिजलो, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्या, आणीबाणीच्या काळात दीड वर्ष तुरुंगवास भोगला. त्यानंतर १८ वर्षांनी मी पहिली निवडणूक लढलो. तेव्हा आता पक्षात आलेल्यांनी काय त्याग केला, किती आंदोलन केली, पोलीसांचा मार खाल्ला, जेलमध्ये गेले हे सांगावे.

औरंगाबाद ः बारा वर्ष मी पक्षाकडे जबाबदारी मागत होतो, अनेक मोठी पद भुषवलेली असतांना मला साध कार्यकारणी सदस्य देखील केल नाही. जिथे मान नाही, काम नाही, जबाबदारी नाही अशा पक्षात माझ्या सारखा कार्यकर्ता थांबूच शकत नाही. काही वर्षापुर्वी मी राष्ट्रवादी सोडून गेलो, ती चूक झाली, आत त्याचे पापक्षालण करत पुन्हा पक्षात आलो आहे. तुम्ही मला स्वीकारलंत त्याबद्दल आभार मानतो. आता मी तुमचाच आहे, द्याल ती छोटी-मोठी जबाबदारी निष्ठेने पार पाडीन आणि राष्ट्रवादीला मराठवाडा आणि महाराष्ट्रात बळकट करीन,  अशी ग्वाही भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी दिली.

१७ नाेव्हेंबर रोजी जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघात दाखल केलेला उमेदवार अर्ज मागे घेत राष्ट्रवादी काॅंग्रेस महाआघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा प्रचार सुरू केला होता. त्यामुळे गायकवाड पुन्हा राष्ट्रवादीत जाणार हे जवळपास निश्चित होते. अखेर आज मुंबई पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत जयसिंगराव गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यावेळी जयसिंगराव गायकवाड म्हणाले, भाजप सध्या एखाद्या आंतकवाद्यांनी ताब्यात घ्यावा तसा काही लोकांच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे माझ्या सारखा कार्यकर्ता त्या पक्षात राहणए शक्यच नाही. माझ्या आधी एकनाथ खडसे आले, आता माझा प्रवेश झाला, यापुढे ही रांग अशीच वाढत जाणार आहे. माझ्यावर तुम्हाला पक्षाने खूप दिले तरी पक्ष सोडल्याचा आरोप केला जातो. पण १८ वर्ष मी पक्षासाठी झिजलो, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्या, आणीबाणीच्या काळात दीड वर्ष तुरुंगवास भोगला. त्यानंतर १८ वर्षांनी मी पहिली निवडणूक लढलो. तेव्हा आता पक्षात आलेल्यांनी काय त्याग केला, किती आंदोलन केली, पोलीसांचा मार खाल्ला, जेलमध्ये गेले हे सांगावे.

माझ्या आयुष्यात पहिले भाषण मी उद्धवराव पाटलांचे ऐकले होते, यशवंतराव चव्हाण यांच्यासह त्या काळातील अनेक नेत्यांच्या विचारावर चालणारा मी माणूस आहे. मध्यंतरी मी वाट चूकलो, नितीन गडकरींच्या प्रेमाला भुललो, पण आज गडकरींची देखील पक्षात काय अवस्था आहे, हे आपण पाहतो. त्यावेळी झालेल्या चुकीचे प्रायश्चित आणि पापक्षालण मी आज करतो आहे. भविष्यात द्याल ती जबादारी पार पाडीन. कंधारच्या मोहिमेवरून नेताजी पालकर जेव्हा शिवाजी महाराजांना भेटायला गेले आणि मी तुमचाच असे म्हटले तेव्हा, महाराजांनी त्यांना गळ्याशी लावून घेत स्वीकारले. तसेच तुम्ही देखील मला स्वीकारले, त्याबद्दल मी तुमचा आभारी असल्याचेही जयसिंगराव म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख