अजित पवारांची देहुबाबत महत्वाची अधिसूचना - Notification that Dehu Gampanchayat has transformed into Nagarpanchayat Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांची देहुबाबत महत्वाची अधिसूचना

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 डिसेंबर 2020

देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्याची अधिसूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात जाहीर केली आहे.

पिंपरी चिंचवड : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पुण्यशील पावनभूमी श्री क्षेत्र देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्याची अधिसूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात जाहीर केली आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा हा विषय काल पूर्णत्वास गेला. 

या कार्यात वारकरी भाविक भक्तांचे व ग्रामस्थांचे श्रद्धास्थान तीर्थक्षेत्र देहुचे स्वतंत्र अस्तित्व कायम रहावे ही जनभावना लक्षात ठेवून मला या निमित्ताने सर्वांची सेवा करण्याची संधी लाभली, याचा मनस्वी आनंद आहे. या कार्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. यावेळी नगरविकास खात्याचे उपसचिव सतिश मोघे, श्री संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे उपस्थित होते.
 

अजित पवारांचे संकेत आणि विलास लांडे पुन्हा झाले सक्रीय! 
पिंपरी: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त (ता. 12 डिसेंबर) शिरूर लोकसभा मतदारसंघातील 1 हजार 156 ज्येष्ठांना भोसरीत बुधवारपासून (ता. 9 डिसेंबर) डिजिटल श्रवणयंत्रांचे मोफत वाटप केले जाणार आहे. यानिमित्त पिंपरी चिंचवडमधील भोसरीचे प्रथम आमदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरातील ज्येष्ठ नेते विलास लांडे पुन्हा सक्रिय झाले आहेत. पिंपरी चिंचवडचा शहराध्यक्ष बदलाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच दिलेला संकेत आणि लांडे यांची सक्रियता खूप काही सांगून जात आहे. 

नुकत्याच झालेल्या विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्तीच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना शहरातील पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे आणि शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील उपस्थित होते. त्यामुळे संतापलेल्या अजितदादांनी शहरातील प्रचार मेळाव्यात या दोघांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत पक्ष संघटनेत बदल करणार असल्याचा इशारा दिला होता. 

पिंपरी चिंचवड शहरात लक्ष घातलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम माजी आमदार लांडे यांच्या भोसरीतील लांडेवाडीच्या राजमाता जिजाऊ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 9 ते 13 डिसेंबर या कालावधीत सकाळी 9 ते 3 या वेळेत होणार आहे. खासदार कोल्हे यांचे "जगदंब प्रतिष्ठान' व इतर संस्थांच्या सहकार्याने कोल्हे यांनी तो आयोजित केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख