मोठी घडामोड : पूजा चव्हाण प्रकरणी भाजप नगरसेवकाला नोटीस.. - Notice to BJP corporator Dhanraj Ghogre in Pooja Chavan case | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी घडामोड : पूजा चव्हाण प्रकरणी भाजप नगरसेवकाला नोटीस..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 मार्च 2021

"पूजाचा लँपटाँप आणून द्या," अशी नोटीस पोलिसांनी घोगरे यांना बजावली आहे.

पुणे : टीकटाँक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी घटनास्थळी उपस्थित असणारे भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. पूजाचा लॅपटाँप घोगरे यांच्याकडे असल्याचा संशय पोलिसांना आहे. "पूजाचा लँपटाँप आणून द्या," अशी नोटीस पोलिसांनी घोगरे यांना बजावली आहे. पूजा चव्हाण हिचा पुण्यातील वानवडी परिसरातील इमारतीतून पडून मृत्यू झाला होता. घोगरे याच भागातील भाजपचे नगरसेवक आहेत.  

दोन दिवसापूर्वी धनराज घोगरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. पूजाचा लॅपटाँप, मोबाईल माझ्याकडे नाही, असे स्पष्टीकरणं घोगरे यांनी पत्रकार परिषदेत दिले होते. घटना घडली त्या दिवशी मी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पोहचलो होतो. पूजाला उचलून रिक्षात ठेवलं होते,  पोलिसांनी मी फोन केला होता. लँपटाँप आणि मोबाईलबाबत मला माहित नाही, असे घोगरे यांनी स्पष्ट केलं आहे. 

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणात रोज नवीन घडामोडी घडत आहेत. पूजाच्या आईवडिलांनी शांताबाई राठोड या कथित नातेवाईकाच्या विरोधात दोन दिवसापूर्वी तक्रार केली आहे. त्याविरोधात शांताबाई यांनी आपल्याला चव्हाण कुटुंबियांकडून जिवाचा धोका असल्याची तक्रार दिली. त्याच्यापुढे आता बंजारा समाजाची बदनामी केल्याबद्दल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याविरोधात शिवसेना उतरली आहे. बीड जिल्हाप्रमुख संगिता चव्हाण या एवढ्यावरच थांबल्या नसून पूजा चव्हाण हिचा मोबाईल व लॅपटाँप हा भाजपचे पुण्यातील नगरसेवक धनराज घोगरे यांनी चोरला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

संगिता चव्हाण याबाबत म्हणाल्या की पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून,चित्रा वाघ यांनी बंजारा समाजाची बदनामी होईल, असं वक्तव्य अनेक वेळा केले आहे. त्यामुळं बंजारा समाजाची नाहक बदनामी झाली.  पूजाच्या मृत्यूनंतर भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी, पूजाचा मोबाईल आणि लॅपटॉप चोरला आहे. त्या लॅपटॉप आणि मोबाईलमधील फोटो हे स्वतःच्या स्वार्थासाठी चित्रा वाघ आणि धनराज घोगरे मीडियाला देत आहेत. त्यामुळे तात्काळ दोघांवर गुन्हा दाखल करावा.  बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे.
  
या प्रकरणात पोलिसांनी काहीच तपास केल्या नसल्याबद्दलही भाजप सरकारला लक्ष्य करत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा गाजत आहे. पूजा चव्हाणच्या घरच्यांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये दिल्याचा आरोप शांताबाई राठोड यांनी करून खळबळ उडवून दिली होती.  

Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख