कायद्यापेक्षा कोणीही मोठा‌ नाही : गृहमंत्री अनिल देशमुख   - No one is bigger than the law  State Home Minister Anil Deshmukh explanation | Politics Marathi News - Sarkarnama

कायद्यापेक्षा कोणीही मोठा‌ नाही : गृहमंत्री अनिल देशमुख  

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

"कायद्यापेक्षा कोणीही मोठा‌ नाही.. कायदेशीर कारवाई केली आहे, नाईक यांच्या कुटुंबियांकडून माझ्याकडे तक्रार आलेली होती, कोर्टाच्या परवानगीनं ही केस ओपन झाली आहे," 

मुंबई : "कायद्यापेक्षा कोणीही मोठा‌ नाही.. कायदेशीर कारवाई केली आहे, नाईक यांच्या कुटुंबियांकडून माझ्याकडे तक्रार आलेली होती, कोर्टाच्या परवानगीनं ही केस ओपन झाली आहे," असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर अनिल देशमुख पत्रकारांशी बोलत होते. 

"केवळ सुडाच्या भावनेने ही केस पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली आहे," असा आरोप भाजपने केला. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी बोलत होते.  इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आपल्याला व आपल्या सासू-सासऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. पोलिस अर्णब यांना घेऊन अलिबागकडे रवाना झाले आहेत. 

अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकवता येत नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणाची केस 2018 मध्येच बंद झाली होती, ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली आहे," असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केला आहे. 

संबंधित लेख