राष्ट्रवादीचे चाणक्य म्हणतात, 'परदे में रहने दो'  

'आता सगळं काही घडून गेले आहे, त्या विषयाबत चर्चा करणे अयोग्य आहे. त्यात लपविण्यासारखे काहीचं नाही. काही गोष्टीवर पडदा असलेला बरा.
3Maha_Praful_Patel_Why_were
3Maha_Praful_Patel_Why_were

पुणे : राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असले की राजकीय भूंकप होतो, अशी चर्चा नेहमीचं होते. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले तरीही, भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार यांच्या त्या निर्णयाचे कवित्व अजून संपलेले दिसत नाही. याबाबत एका वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले. 

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना प्रफुल्ल पटेल यांना राज्यात झालेल्या सत्तांतरावेळी घडलेल्या राजकीय नाट्याबाबत विचारले असता ते म्हणाले की 'आता सगळं काही घडून गेले आहे, त्या विषयाबत चर्चा करणे अयोग्य आहे. त्यात लपविण्यासारखे काहीचं नाही. काही गोष्टीवर पडदा असलेला बरा. भाजपासोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा निर्णय हा स्वत: अजित पवार यांचाच होता. त्याचा पक्षांशी संबध नव्हता.' 

विधानसभेच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी आमच्याकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. आम्ही विरोधी पक्ष म्हणून बाकांवर बसणार होतो. दरम्यान भाजप आणि शिवसेना यांच्यात खातेवाटप जागांवरून मतभेद सुरू झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याशी चर्चा केली असावी की आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही. आमच्या सोबत या, असे पटेल यांनी मुलाखतीत सांगितले. सरकार स्थापनेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही भाजपासोबत जाण्यासंबंधी चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट करून पटेल यांनी केला. ते म्हणाले, आमच्याकडं संख्याबळच नव्हतं. त्यामुळे आम्ही सरकारमध्ये जाण्याची शक्यताच नव्हती. भाजपा आणि शिवसेनेत एकमत न झाल्याने त्यांच्यात मतभेद झाले. राष्ट्रवादीचा असा कोणताही विचार नव्हता. 

बातमी वाचा : मोबाइल क्रमांक अकरा अंकी होणार का  

पुणे : देशभरातील मोबाइल क्रमांक हे आता अकरा अंकी होणार असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी नुकतेच दिले होते. या वृत्ताचे खंडण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) केले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) सांगितले आहे, की लॅडलाइनवरून मोबाइलवर फोन करण्यासाठी ‘0’लावण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मोबाईल क्रमांक 10 अंकांऐवजी 11 अंकी होणार नसल्याचे ट्रायने स्पष्ट केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com