रोहित पवारांनी केलं फडणवीसाचं कौतुक...म्हणाले...

आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांचे कौतुक केलं आहे.पवार यांनी टि्वट करत फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
amuta9.jpg
amuta9.jpg

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं गाणं महिला दिनानिमित्त नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्याबाबत अमृता फडणवीस यांनी यापूर्वी सोशल मीडियावरून माहिती दिली होती. काल महिला दिनी ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे त्यांचं गाणं प्रदर्शित झाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या गाण्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अमृता फडणवीस यांचे कौतुक केलं आहे. याबाबत रोहित पवार यांनी टि्वट करत अमृता फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृताताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!

  
अमृता फडणवीस यांनी या गाण्याबाबत यापूर्वी माहिती दिली होती. त्या म्हणाल्या होत्या, “जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी… तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतिचा प्रवाह रोकणे शक्य नाही! ‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत”  त्यानंतर अमृता यांनी  ट्विट करून गाणं प्रदर्शित झाल्याची माहिती दिली होती.

हेही वाचा : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश...

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड, पुरंदर आणि भोर तालुक्यातील विविध ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती आणि रुंदीकरणाची कामे लवकरच पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे
यांनी केलेल्या मागणीनुसार या रस्त्यांच्या कामासाठी राज्य सरकारने एकूण १५ कोटी ५५ लाख दहा हजार रुपये मंजूर केले आहेत. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडॆ सुळे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करत होत्या. त्यानुसार निधी मंजूर झाला आहे. लवकरच या रस्त्यांची कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निधी मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये भोर तालुक्यातील भोर पासून उत्रौली कान्हेवाडी खंडाळा फाटा ते सातारा जिल्हा हद्दीपर्यंत दोन कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. 

Edited  by :  Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com