'आम्हाला स्मृतिभ्रंश झाला असेल तर तुम्ही मेंदू कुठे गहाण ठेवलाय..' राऊतांचा सवाल.. - ncp leader Sharad Pawar letter regarding agricultural act is correct Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

'आम्हाला स्मृतिभ्रंश झाला असेल तर तुम्ही मेंदू कुठे गहाण ठेवलाय..' राऊतांचा सवाल..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 डिसेंबर 2020

नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास नाही, म्हणून जनता रस्त्यावर उतरली आहे," असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 

मुंबई : "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावेळी लिहिलेलं पत्र योग्यच होत. जनतेचा नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास नाही, म्हणून जनता रस्त्यावर उतरली आहे," असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 

संजय राऊत म्हणाले की भाजपने घाईघाईने कायदे मंजूर केले होते. आम्ही म्हटलं की थोडे थांबा. या तीन विधेयकांचा अभ्यास करण्यासाठी पाठवू, पण सरकारने ऐकले नाही. काही दिवस थांबून अध्ययन केलं असते तर कदाचित बिलामध्ये बदल केले असते.शेतकरी नाराज आहे, याची खापर आमच्यावर फोडणे हे चांगल्या मानसिकतेचे लक्षण नाही. शरद पवार तज्ज्ञ आहेत, मग कायदा मांडताना का त्यांच्याशी सल्लामसलत केली नाही? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

महाराष्ट्रात भाजप विरोधात आहे पुढची चार वर्षे हमखास ते विरोधात राहितील. त्यांचा हे वैफल्य आहे. त्याकडे लक्ष द्यायचं नाही. एनडीए आहे की नाही ते मला माहित नाही. 
हे विधेयक पुढे धकाला अशी मागणी शिवसेनेने त्यावेळी केली होती. विधेकाच्या बाजूनं शिवसेनेनं कधीच मतदान केलं नाही. लोकांचा संताप आम्हाला माहीत आहे. आज तो दिसत आहे. 

आम्ही सगळ्यांनी त्यावेळी ठरवलेले की काही काळ तटस्थ राहिले पाहिजे. बिल जरी जबरदस्तीने, दडपशाहीने मंजूर केले तरी लोक बंड करणार हे माहीत होतं आज ते दिसते आहे, असे राऊत यांनी सांगितले. 

भाजपनं टीका करण्यापेक्षा आणि जुने कागद खणून काढण्यापेक्षा शेतीविषयी काही भूमिका मांडायला पाहिजे हवी होती. घाईघाईने कायदे मंजूर केले. आम्हाला स्मृतिभ्रंश झाला असेल तर तुम्ही मेंदू कुठे गहाण ठेवलाय? तुमच्या खोपडीत मेंदू असता, तर तुमच्या हृदयात मन असत तर आज शेतकऱ्यांच्या बाजूने बसला असता, असे राऊत म्हणाले.

आधी शरद पवारांचं पत्र वाचून तर घ्या : प्रफुल्ल पटेल
शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी दिलेले पत्र खरं आहे. त्यात त्यांनी असं म्हटल आहे की, कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यामध्ये संशोधन करून व्यापाऱ्यांना सुद्धा यामधून खरेदी करण्याचा अधिकार देण्यात यावा. जेणेकरून शेतकऱ्यांना आज जे भाव मिळत आहेत, त्यापेक्षा जास्त भाव मिळतील. त्यामुळे पवारांच्या पत्रावर राजकारण करण्याआधी ते पत्र नीट वाचून तर घ्या, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. जिल्ह्यातील पवनी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री पटेल म्हणाले, शरद पवारांच्या पत्रात कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याचा कुठेही उल्लेख नव्हता. पर्यायी व्यवस्था जी आहे, त्याशिवाय दुसरी व्यवस्था असू नये, असेही त्यांचे म्हणणे नव्हते. भाजपच्या सरकारने मागील सत्रामध्ये जो कायदा मंजूर केला, तो अतिशय घाईघाईत केला, कुणाशी चर्चा न करता केला. संसदेत आम्हाला केवळ दोनच मिनिटे बोलण्याची संधी देण्यात आली. या कालावधीत कायद्याची दुसरी बाजू समजावून सांगणे अवघड होते. हे जाणूनबुजून करण्यात आले. कारण हा कायदा अस्तित्वात आणताना सरकारला मुळात कुणालाही विश्‍वासात घ्यायचे नव्हते आणि चर्चा तर मुळीच घडू द्यायची नव्हती. त्यामुळे हा अन्यायकारक कायदा अस्तित्वात आला आणि आज दिल्लीच्या सीमांवर दिसत असलेली विदारक स्थिती उत्पन्न झाली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख