एनसीबी प्रमुखाच्या पत्नीचा विनयभंग...

अभिनेत्री क्रांतीरेडकर यांची गाडी अडवून त्यांना एका व्यक्तीने धक्काबुक्की केली.
kanti28.jpg
kanti28.jpg

मुंबई : मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे विभागप्रमुख समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या विनयभंग प्रकरणी एकाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. गोरेगाव पोलिसांनी प्रितम वर्मा याला अटक केली आहे. त्याने गोरेगाव येथील जैन हाँस्पिटलच्या गल्लीत क्रांती रेडकर यांची गाडी अडवून त्यांना धक्काबुक्की केली. मंथन हाँटेलजवळ ही घटना घडली.

प्रितम वर्मा याने दारू पिवून त्याची गाडी ही क्रांती यांच्या गाडीसमोर उभी केली होती. गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग अनावर झाल्याने त्याने क्रांती यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. समीर वानखडे यांनी काही दिवसांपूर्वीच डोंगरी ड्रग्जची कारवाई करून अंडरवल्डला जोरदार धक्का दिला होता. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी प्रितम वर्मा या आरोपीला अटक केली आहे. 

एनसीबीच्या दोन दिवसापूर्वी मुंबई युनिटने दिल्लीत कारवाई करून एका ड्रग्स व्यापाऱ्याला अटक केली आहे. मोहमद अनस असं त्याचं नाव आहे. मुंबईत आणून त्याला कोर्टात हजर केलं असता दोन मार्चपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. अनस हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आहे. एनसीबीच्या मुंबई झोनचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स असल्याची माहिती मिळाली होती.  


हेही वाचा : खासदार डेलकर यांनी आत्महत्या का केली ?

मुंबई : सात वेळा लोकसभेचे सदस्य असलेल्या मोहन डेलकर यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हायला हवी. डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या का केली? गुजरात, दिल्लीत त्यांची घरे आहेत. पण मुंबईचे पोलीस आपल्या मृत्यूनंतर ‘सुसाईड नोट’ हा पुरावा मानून आरोपींना अटक करतील ही भावना त्यांच्या मनात नक्कीच असेल. आपल्या झुंजारपणासाठी, स्वाभिमानासाठी एका खासदाराला प्राणाचे मोल द्यावे लागले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आता काय करणार आहेत? असा सवाल सामनाच्या रोखठोक मधून खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com