मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पाण्यातून प्रवास...

मतदानाचा हक्क बजावताना नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर कराव्या अशी मागणी केली आहे.
ngp15.jpg
ngp15.jpg

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील केळी ग्रामपंचायतमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांना नागन प्रकल्पाच्या पाण्याखाली आलेल्या पुलावरून प्रवास करत मतदानाचा हक्क बजावावा लागत आहे. पावसाळ्यात धरणाचे पाणी ओव्हर फ्लो झाल्यामुळे संपूर्ण पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे कंबरे एवढ्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. 

या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी मोठ्या पूलाचे काम गेल्या दोन वर्षापासून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अर्धवट आहे, या ठिकाणी सुरू असलेल्या पुलाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तर पुनर्वसन केवडीपाडा गावाला तीन किलोमीटर लांब मतदान केंद्रावर मतदानासाठी जावं लागत आहे. केवडीपाडा गावात मतदान केंद्र निर्माण करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली आहे. 

नागन प्रकल्पामुळे पुनर्वसन-केवडीपाडा गावाला पुनर्वसनामुळे मोठा फटका बसला आहे. वीस वर्षांनंतरही अनेक नागरिकांना पुनर्वसनाचा मोबदला मिळालेला नाही. एकूणच केळी ग्रामपंचायत मधील नागरिकांना बाजाराच्या ठिकाणी व शेतात जाताना नागन प्रकल्पाच्या पाण्याखाली आलेल्या या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. आपला मतदानाचा हक्क बजावताना नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर कराव्या अशी मागणी केली आहे. 

आज सकाळपासून 'मिनी मंत्रालय'म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठीचे मतदान सुरु झाले आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर या निवडणुका होत आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर आता या निवडणुका होत आहेत.

राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक आहे. या  निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन राज्यातील नेत्यांनी केले होते. त्यासाठी लाखोंची बक्षीसे जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे अनेक निवडणुका बिनविरोध झाल्या. काही ठिकाणी सरपंचपदासाठीचे लिलावही झाले. अशा ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात येणार आहे. या निवडणुकांनंतर सरपंचपदासाठीचे आरक्षण काढण्यात येणार आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात एकूण ८७ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाली होती. त्यापैकी २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तर एका ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द झाल्याने उर्वरित ६४ ग्रामपंचायतींसाठी सकाळपासूनच शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे.
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com