नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार, त्यांच्याजागी पृथ्वीराज चव्हाण येणार?

नाना पटोले यांच्या जागी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आणले जाणार आहेत. मात्र त्यांचे नाव राष्ट्रवदी काँग्रेसला पसंत पडणार का, हा ही प्रश्नआहे.
nana patole will be next maharashtra state congress president
nana patole will be next maharashtra state congress president

पुणे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत नेतृत्वबदलाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. आक्रमक नेते आणि विधान परिषदेचे अध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे वृत्त आहे. नुकतीच पटोले यांनी केलेली दिल्लीवारी हा त्या घडामोडींचा भाग असल्याचे मानले जात आहे. 

लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाने बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकांना सामोरे गेला. अनेक नेत्यांनी पक्षांतरे करूनही काँग्रेसला नुकसान झाले नाही. 2009 च्या तुलनेत 2 जागा जास्त निवडून आल्या. निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आश्चर्यकारक घडामोडी झाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्रित सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांना महसूलमंत्रीपद मिळाले. ते सद्या प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्रीपद या दोन्ही जबाबदारी सांभाळत आहेत. 

महाराष्ट्रात आगामी काळात पक्षाच्या बांधणीचे आव्हान लक्षात घेता स्वतंत्रपणे प्रदेशाध्यक्ष नेमणे आवश्यक बनले आहे. त्याचाच भाग म्हणून बाळासाहेब थोरात यांच्या जागी नव्या नेत्याचा शोध सुरू आहे. या जागेसाठी सुरवातीपासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चित आहे. मात्र ते या पदासाठी इच्छुक नाहीत. त्यामुळे नाना पटोले यांच्या नावावर एकमत झाले आहे. नाना पटोले हे सद्या विधानसभेचे अध्यक्षपद भुषवत आहेत. त्यांचे व्यक्तीमत्व आक्रमक असल्याने ते मंत्रीमंडळात किंवा संघटनेत असावेत, असा सूर सुरवातीपासून आहे. शिवाय पटोले हे विदर्भातील शेतकरी नेते आहेत. महत्वाची बाब म्हणजे ते भाजपवर तुटून पडत असतात. या प्रतिमेचा फायदा पक्षाला होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावून प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जावू शकते, अशा घडामोडी आजमितीला सुरू आहेत.

नाना पटोले यांच्या जागी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आणले जाणार आहेत. मात्र त्यांचे नाव राष्ट्रवदी काँग्रेसला पसंत पडणार का, हा ही प्रश्न आहे. 

पुणे महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षापासून 
पुणे : पुणे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन करण्यास राज्य सरकारने आज मंजुरी दिली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ स्थायीचे समितीचे अध्यक्ष असताना दोन वर्षापूर्वी महापालिकेच्या अर्थसंकल्पात महाविद्यालय सुरू करण्याची कल्पना मांडून त्यासाठी अर्थिक तरतूद करण्यात आली होती. हे महाविद्यालय डॉ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १० एकर जागा राखीव करण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com