मुंबई महापालिका आयुक्तांच्या कामाची पुन्हा दखल..  देशातील 50 प्रभावशाली सनदी अधिकाऱ्यांच्या पंक्तीत  - Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal selected in Fame India | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई महापालिका आयुक्तांच्या कामाची पुन्हा दखल..  देशातील 50 प्रभावशाली सनदी अधिकाऱ्यांच्या पंक्तीत 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

‘फेम इंडिया 2020’ मध्ये आयुक्त चहल यांची निवड करण्यात आली आहे. 

मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी कोरोना महामारीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाला थोपवण्यासाठी त्यांनी ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम प्रभावीपणे राबवली. इकबाल सिंह चहल यांच्या कार्याची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली आहे. ‘फेम इंडिया 2020’ मध्ये आयुक्त चहल यांची निवड करण्यात आली आहे. 

मुंबईतील सर्व आरोग्‍य यंत्रणा, डॉक्‍टर्स, लोकप्रतिनिधी, खासगी दवाखाने, नर्सिंग होम, स्‍वयंसेवी संस्‍था यांच्यात समन्वय साधत मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात आणला. त्यांच्या या कामगिरीचे केंद्र सरकार, जागतिक आरोग्य संघटना, तसेच जागतिक बँकेनेही कौतुक केले.  इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्समार्फत आयएसीसी कोव्हिड क्रुसेडर 2020 – एक्झेम्प्लरी वर्क डन बाय ए ब्युरोक्रॅटस्‌ – इंडिया या संवर्गामध्ये आयुक्त चहल यांना सप्टेंबर महिन्यात पुरस्कार देण्यात आला होता

‘फेम इंडिया 2020’ मधील निवडीमुळे आयुक्त चहल यांना देशातील 50 प्रभावशाली सनदी अधिकाऱ्यांच्या पंक्तीत बसण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यांना सप्टेंबर महिन्यात ‘आयएसीसी कोव्हिड क्रुसेडर 2020’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची आता ‘फेम इंडिया 2020’ मध्ये निवड झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे. ‘चेस द व्हायरस’ या मोहिमेत त्यांनी टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, ट्रि‍टमेंट आणि क्‍वारंटाईन ही पंचसूत्री अवलंबून प्रत्‍यक्ष काम केले. चहल यांच्या अथक प्रयत्नातून धारावी पॅटर्न जगासाठी रोल मॉडेल ठरले आहे. मुंबईत धारावीसारख्या झोपडपट्टीबहुल भागातील कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी चहल यांनी अथक परिश्रम घेतले होते. 
 

हेही वाचा : शरद पवार शेताच्या बांधावर..मुख्यमंत्री दूरचित्रवाणीवर...? 

मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत असून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र अजूनही घरात बसूनच अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेण्यात मग्न आहेत.आंध्र ओडिशा आणि तेलंगणा राज्याला अशाच अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका बसला आहे. तेथील मुख्यमंत्र्यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहण्या केल्या असून हवाई दौरेही काढले आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र अजूनही घराबाहेर पडलेले नाहीत, असे तरी सध्याचे चित्र आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख