उद्धवजी, संजय राऊतांचा राजीनामा घ्या : नवनीत राणा 

संजय राऊत हे नेहमीच महिलांचा अपमान करीत आहेत, त्यांनी आपली मर्यादा सांभाळी, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे. राज्य सरकार सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
collage (6).jpg
collage (6).jpg

अमरावती :  "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांचा अपमान करणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा राजीनामा मागायला पाहिजे," असे मत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केले आहे. संजय राऊत यांनी महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी महाराष्ट्राचा ठेका घेतला आहे का ? असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे.  संजय राऊत हे नेहमीच महिलांचा अपमान करीत आहेत, त्यांनी आपली मर्यादा सांभाळी, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे. राज्य सरकार सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. 

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या पाली हिल येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेने काल पाडून टाकले, या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी फोसबुकवर व्हिडिओ शेअर करून संजय राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

आपल्या व्हिडिओत राणा म्हणतात की कंगना राणावतच्या बंगल्यावर कारवाई करण्यापूर्वी महापालिकेनं कंगनाला नोटिस द्यायला पाहिजे होती. हे बांधकाम पाडण्यात महापालिकेनं नियमाचं पालन केलेलं नाही. महापालिकेने केलेली ही कारवाई चुकीची व बेकायदेशीर आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते की आपल्याला जर महिलांविषयी आदर असेल तर आपण संजय राऊत यांचा राजीनामा घ्या.  

कंगनाविरोधात महाराष्ट्रात वातावरण तापले असल्याने केंद्रातील मोदी सरकारने तिला 'वाय' सुरक्षा दिली आहे. तिने 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचे जाहीर केले होते. यावर शिवसेनेने कंगनाला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, अशा इशारा दिला होता. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगनाला होम क्वारंटाईन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे कंगनाने मुंबईला जाण्यासाठी जोरदार तयारी केली. तिने कोरोना चाचणी केली. मुंबईत गेल्यानंतर होम क्वारंटाईन व्हावे लागू नये म्हणून तिने ही शक्कल लढविली होती. 

कंगनासोबत तिची बहीण रंगोली चंडेल आणि आणखी एका व्यक्तीची चाचणी करण्यात आली होती. कंगना काल सकाळी वाय सुरक्षेसह चंडीगडमधील चंडीगड विमानतळावर आली. तेथून विमानाने ती मुंबईकडे रवाना झाली होती. ती मुंबई विमानतळावर दाखल झाली. कंगनाचे विमानतळावर दाखल झाल्यानंतर सीआरपीएफच्या पथकाने तिला त्यांच्या वाहनात बसवले. तेथून तिला घेऊन तातडीने पथक बाहेर पडले. 

कंगनाला विरोध करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने विमानतळावर जमले होते. याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्तेही विमानतळावर जमले आहेत. शिवसैनिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विमानतळावर जोरदार घोषणाबाजी सुरू होती.विमानतळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) बंदोबस्त तैनात करण्यात आला होती. यात करनी सेनाही कंगनाच्या बाजूने मैदानात उतरली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com