"शेतकरी त्रस्त मुख्यमंत्री मातोश्रीत मस्त.." राणा यांचा टोला  - MP Navneet Rana and MLA Ravi Rana meet the Governor to help the farmers  Criticism on the Chief Minister  | Politics Marathi News - Sarkarnama

"शेतकरी त्रस्त मुख्यमंत्री मातोश्रीत मस्त.." राणा यांचा टोला 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

"विदर्भातील शेतकरी त्रस्त मुख्यमंत्री मातोश्रीत मस्त.." असे म्हणत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसापासून विदर्शातील विविध पिकांचे बोंडआळीमुळे नुकसान होत आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.   

"विदर्भातील शेतकरी त्रस्त मुख्यमंत्री मातोश्रीत मस्त.." असे म्हणत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. विदर्भातील सोयाबीन, तूर, कापूस, मुंग, उडीद, संत्रा, धान आदी पीक उत्पादक शेतकऱ्यांचे बोंडआळीमुळे नुकसान झाल्याचे त्यांना मदत करावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी राज्यपालांकडे केली आहे. बोंडआळीने खराब झालेली कापसाची रोपे राणा यांनी राज्यपाल कोश्यारी यांना भेट दिली आहेत. 

सोयाबीन, तूर, कापूस, मुंग, उडीद, संत्रा, धान आदी पिकांचे नुकसान झाल्याने यंदा शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाऊ नये, म्हणून शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई म्हणून सरसकट हेक्टरी 50 हजारांची मदत करावी, अशी मागणी राणा यांनी केली आहे. यापूर्वी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टी च्या वतीने बोंड अळीचे झाड पेटून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

काही दिवसांपूर्वीच राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमवीर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या प्रमुख नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचे दौरे केले होते. यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १० हजार कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आली आहे. फळबागांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली होती.

हेही वाचा : मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार... 

मुंबई : महाराष्ट्राच्या सात बारा वर दिल्लीचे नाव कोणी लावले? असा जाब शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. "मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच आहे. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार," असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. कांजूरची जागा राज्य सरकारचीच असल्याचा दावा करत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कारशेडचे बांधकाम सुरूच राहील, अशी भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडचा प्रकल्प रद्द करून तो कांजूरमार्गमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या जागेवरून सध्या केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात वाद निर्माण झाला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत बोलत होते. याबाबत संजय राऊत यांनी टि्वट केलं आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख