वंदे भारत उपक्रमांतर्गत ३ हजारांहून अधिक नागरिक महाराष्ट्रात

बृहन्मुंबईतील प्रवाशांना संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा हॉटेल्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
more than three thousand citizens return in maharashtra under vande mataram mission
more than three thousand citizens return in maharashtra under vande mataram mission

मुंबई :  वंदे भारत उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात २६ फ्लाईट्सच्या माध्यमातून ३४५९ नागरिक परत आले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या ११३७ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १५७२ असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ७५० इतकी आहे. दि. ७ जून २०२० पर्यंत साधारणत: आणखी सहा फ्लाईटस येणे अपेक्षित आहे.  आतापर्यंत महाराष्ट्रात ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया  या देशातून प्रवासी आले आहेत.

बृहन्मुंबईतील प्रवाशांना संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा हॉटेल्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यातील तसेच राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. तिथे गेल्यावर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांकडून आलेल्या प्रवाशांना कॉरंटाईन करण्याची कार्यवाही केली जात आहे.

आलेल्या नागरिकांचे कडक कॉरंटाईन होईल यावर प्रशासनाचे कडक लक्ष असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात असून या नागरिकांचा प्रवासी पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे. वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीपणे पार पाडत आहे.

जलदगतीने निर्णय हे मोदी सरकारचे वैशिष्टय : बापट
पुणे : जलद निर्णय प्रक्रिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे वैशिष्टय आहे. गेल्या वर्षभरात देश पातळीवर विकासाला पूरक असे अनेक निर्णय मोदी सरकारने घेतले. राज्यसभेत बहुमत नसतानादेखील मित्र पक्षांच्या सहकार्याने महत्वाची विधेयके मंजूर करून घेतली. भाजपेतर सरकारांच्या गेल्या ६० वर्षात जी कामे झाली नाहीत इतकी कामे गेल्या सहा वर्षात खऱ्या अर्थाने मोदी सरकारने मार्गी लावली आहेत, असे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले. बापट म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले. या काळात जम्मू आणि काश्‍मीरचा स्वातंत्र्यापासूनचा प्रश्‍न या सरकारने एका फटक्यात सोडवला आहे. मुस्लिम भगिनींच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा तिहेरी तलाक कायदा या सरकारने प्रत्यक्षात आणला.  या कायद्याने मुस्लीम समाजात एक प्रकारची सामाजिक क्रांती झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com