सरसंघचालक म्हणाले, "सत्ता संघर्ष करताना विवेक वापरायला हवा... " - Mohan Bhagwat said Elections should be an ideological battle not a war | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

सरसंघचालक म्हणाले, "सत्ता संघर्ष करताना विवेक वापरायला हवा... "

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

"सत्ता संघर्ष करताना विवेक वापरायला हवा. निवडणुकांमध्ये वैचारिक लढा हवा, युद्ध नको," असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज  केलं.

नागपूर : "सत्ता संघर्ष करताना विवेक वापरायला हवा. निवडणुकांमध्ये वैचारिक लढा हवा, युद्ध नको," असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज नागपूर येथे केलं. दसरा मेळ्याव्यात ते बोलत होते. नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला मोजकेच स्वयंसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. ऑनलाईनच्या माध्यमातून देशभरातील स्वयंसेवक या दसरा मेळाव्यात सहभागी झाले.

‘तुकडे-तुकडे गँग’वर मोहन भागवतांनी यावेळी हल्लाबोल केला. 'भारत ते तुकडे होंगे' म्हणणारेच वेळप्रसंगी संविधानाचे दाखले देतात. अशा लोकांपासून समाजानं साधव राहणं गरजेचं आहे, '' असे लोक संघाबाबत चुकीचं मत पसरवण्याचं काम करत आहेत. पण संघ आपल्या कर्तव्याप्रती एकनिष्ठ असल्याचा विश्वास भागवत यांनी यावेळी व्यक्त केला.

मोहन भागवत म्हणाले की जगभर सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनामुळं अनेकांचा बळी गेला, आर्थिक, औद्योगिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. पण या कोरोनामुळं समाजामध्ये पुन्हा एकदा सेवाभाव जागृत केला आहे. कोरोना महामारीच्या काळात समाज एकरुप होताना दिसत आहे. कोरोनामुळं समाजामध्ये पुन्हा एकदा सेवाभाव जागृत केला आहे. कोरोना महामारीच्या काळात समाज एकरुप होताना दिसत आहे.

कोरोनाच्या संकटामुळे गावी गेलेल्या मजूराविषयी मोहन भागवत म्हणाले की अनेकांच्या नोकऱ्या गेल्यानं अनेक संस्थाचालकांना विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क मिळालं नाही. त्यामुळं हजारो शिक्षकांचे पगार रखडले आहेत. अशावेळी शिक्षण क्षेत्रात सातत्याने बदलाची गरजही भागवत यांनी व्यक्त केली. कोरोनाचे जसे वाईट परिणाम पाहायला मिळत आहेत. कोरोनाकाळात अनेक मजूर गावी गेले. त्यातील काही आज परतले आहेत. पण काही क्षेत्रात कामाच्या पद्धती बदलल्या आहेत. त्यामुळं कामगारांना नव्याने प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. 

मोहन भागवत म्हणाले की भारताला चीनपेक्षा अधिक मजबूत व्हावे लागेल. शेजारील राष्ट्रांशी भांडण करीत बसणं ही भारतीची भूमिका नाही. काही जण धर्माच्या नावावर समाजाला तोडू पाहत आहेत. चुकीच्या गोष्टी पसविण्यापूर्वी संघाचा समजून घ्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख