मनसचे नेते संदिप देशपांडेंकडून संजय राऊतांचा 'तो ' फोटो व्हायरल.. - MNS leader Sandeep Deshpande took a photo of MP Sanjay Raut viral | Politics Marathi News - Sarkarnama

  मनसचे नेते संदिप देशपांडेंकडून संजय राऊतांचा 'तो ' फोटो व्हायरल..

गणेश कोरे
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीवर राऊत यांनी राज यांचे नाव न घेता टिका केली आहे. 

पुणे : "मुख्यमंत्री हे लोकनियुक्त असून, राज्याचे प्रश्‍न सोडविण्याची त्यांची जबाबदारी असते. विविध प्रश्‍न घेऊन, राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे," अशी टीका संजय राऊत यांनी शनिवारी (ता.३१) पुण्यात राज ठाकरे यांचं नाव न घेता केली. त्यावर मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी "महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत" असे राऊत आणि राज्यपालां भेटीचा फोटो ट्वीट केला आहे.

पुण्यात झालेल्या वार्तालापात खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीवर राऊत यांनी राज यांचे नाव न घेता टिका केली आहे. 

राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली होती. वीजबिले वाढीव दराने येत असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून होत आहे. हाच प्रश्न घेऊन राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीवर आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीकात्मक भाष्य केलं आहे संजय राऊत यांनी म्हटलंय की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते राज्याचे प्रमुख असताना राज ठाकरेंनी राज्यपालांना जाऊन भेटणं योग्य नाही. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. याप्रकारची टीका संजय राऊत यांनी केली आहे होती.  

राऊत म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री हे लोकनियुक्त असून, राज्याचे प्रश्‍न सोडविण्याची त्यांची जबाबदारी असते. विविध प्रश्‍न घेऊन, राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे. या टिकेला मनसे नेते संदिप देशपांडे यांनी संजय राऊत राज्यपालांना नतमस्तक होणारे छायाचित्र ट्विट करुन, महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत असे म्हणत टिकेचे परतफेड केली आहे.

"राजभवन ही राजकारण करण्याची जागा नाही. त्यांनी बाहेर राजकारण करावे, आम्ही दाखवून देऊ, हे सरकार पडणार नाही आणि त्यांच्यातील बोलणंदेखील बंद झालं नाही. उर्वरित चार वर्ष सरकार पूर्ण करेल,” असा विश्वास राऊत यांनी आज पुण्यात पत्रकाराशी बोलताना व्यक्त केला होता.  

 Edited  by : Mangesh Mahale  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख