mla devendra bhuyar absent in swabhani sanghatanas agitation
mla devendra bhuyar absent in swabhani sanghatanas agitation

आमदार देवेंद्र भुयार स्वाभिमानीच्या आंदोलनापासून चार हात लांब

जनतेच्या प्रश्नासंबंधी आक्रमक राहणारे देवेंद्र भुयार यावेळी पक्षांतर्गत वादामुळे आंदोलनापासून दूर राहिल्याचे बोलले जात आहे.

पुणे : लॉकडाऊनच्या काळातील वाढीव घरगुती वीज बिले माफ करण्यात यावीत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीन महावितरणच्या विरोधात सोमवारी राज्यभर आंदोलन केले गेले. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात वीजबिलाची होळी केली. राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित वीजबिलाची होळी करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार हे आंदोलनापासून दूर राहिले. त्यांच्या मतदारसंघात आंदोलन झाले नाही.

कोरोनाच्या काळात महावितरणने वाढीव बीले दिली. याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विजबिलाची होळी केली. कोल्हापूर येथील आंदोलनात राजू शेट्टी यांच्या सोबत शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते एन डी पाटील सहभागी होते. यावेळी विजबिलाची होळी करण्यात आली.
 स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर आंदोलन करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार हे मात्र या आंदोलनापासून दूर राहिले. त्यांच्या मतदारसंघात या आंदोलनाबाबतची कोणतीही हालचाल दिसली नाही. आमदार भुयार यांच्या सोशल मीडियावरवरही यासंबंधाने काही म्हटलेले नाही.

या आंदोलनाबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सर्वपक्षियांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांच्याच पक्षाचे आमदार या आंदोलनापासून दूर राहिले. महिनाभरापुर्वी भुयार हे स्वाभिमानीत नाराज असल्याचे स्पष्ट झाले. "स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मला मंत्रिपद मिळू दिले नाही' असा आरोप त्यांनी केलेला आहे. त्यावर भुयार यांची समजूत काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र ती समजूत काढण्यात संघटनेला अजून यश आल्याचे दिसत नाही. या धुसफुसीतून भुयार आंदोलनापासून दूर राहिल्याचे बोलले जात आहे. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

देवेंद्र भुयार हे आक्रमक कार्यकर्ते आहेत. या आक्रमकतेच्या बळावर ते आमदारपदावर पोहचलेले आहेत. वीज बिलांची होळी करण्याचे आवाहन शेकाप, स्वाभिमानी आणि जनता दलाने पुकारले होते. सर्वपक्षीय लोकांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. यापार्श्वभुमीवर भुयार यांची आंदोलनातील अनुपस्थिती चर्चेची ठरली आहे.

नव्या आदेशाने गावातील राजकारणी चक्रावले
चोपडा (जि. जळगाव ) : राज्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर यापुढे प्रशासक म्हणून शासकीय अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार नसून, त्याऐवजी प्रशासक म्हणून ‘योग्य व्यक्तीची’ नियुक्ती करता येईल, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढलेल्या राजपत्रात नमूद केले आहे. राज्यपालाच्या या आदेशामुळे गावातील राजकारणीच चक्रावले आहेत. ‘योग्य व्यक्ती’ म्हणजे नेमकी कोण..? यावर चर्चा रंगू लागली आहे. 

Edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com