अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या; जयंत पाटलांची केंद्राकडे मागणी

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंती निमित्त आज वाटेगाव येथे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
minister jayant patl demands bharatranta award for anna bhau sathe
minister jayant patl demands bharatranta award for anna bhau sathe

सांगली : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समाज मन जागविण्याचे काम स्वतःच्या शाहिरीतून आणि प्रतिभेतून केले आहे. प्रतिभावंत आणि संपूर्ण महाराष्ट्राला मार्गदर्शक असणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करावे, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आग्रहाने केल्याची केल्याचे सांगितले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंती निमित्त आज वाटेगाव येथे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार मानसिंग नाईक, पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रविंद्र सबनीस यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तदनंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री जयंत पाटील यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जुन्या घरास भेट देऊन आण्णा भाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन केले व येथे आण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर साकारलेल्या शिल्पसृष्टीची पाहणी केली. यावेळी वाटेगावचे सरपंच सुरेश साठे, आणा भाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्री साठे व कुटुंबीय उपस्थित होते.

बच्चू कडूंचा भाजपवर प्रतिहल्ला

पुणे: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेते रोज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवत असताना आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांचे टेन्शन वाढविणारा दावा केला आहे. 

बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे नेते आमदार आहेत. त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. भाजपकडूनमुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ले चढवले जात असताना बच्चू कडू यांनी प्रतिहल्ला चढवला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून आमदार फोडण्याचा दावा केला जात आहे. ऑक्टोंबरमध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार हे खात्रीने सांगितले आहे. फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणून राज्यपाल नियुक्त आमदारांची प्रक्रिया थांबवण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

Edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com