मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार...महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले ?  - Metro car shed will be on Kanjur Marg only  A big conspiracy is underway to stop the development of Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार...महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले ? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

"मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच आहे. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार," असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या सात बारा वर दिल्लीचे नाव कोणी लावले? असा जाब शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. "मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच आहे. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार," असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. कांजूरची जागा राज्य सरकारचीच असल्याचा दावा करत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कारशेडचे बांधकाम सुरूच राहील, अशी भूमिका घेतली आहे.  

राज्य सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडचा प्रकल्प रद्द करून तो कांजूरमार्गमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या जागेवरून सध्या केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात वाद निर्माण झाला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत बोलत होते. याबाबत संजय राऊत यांनी टि्वट केलं आहे. 

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्र सरकारने दावा केल्याने सध्या राज्यसरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद सुरु आहेत. राज्य सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडचा प्रकल्प रद्द करून तो कांजूरमार्गमध्ये उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्राने जागेवर दावा केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यानंतर राज्य सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे. कांजूरची जागा राज्य सरकारचीच असल्याचा दावा करत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कारशेडचे बांधकाम सुरूच राहील, असं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र सध्या सुरू असून हे षडयंत्र एकजुटीने ऊधळून लावूया, असे आवाहन राऊत यांनी केलं आहे.  

मुंबई मेट्रोच्या कार शेडसाठी आरेची जागा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे. "आरे'ऐजवी आता कांजूर येथे ही कारशेड होणार आहे. ही संपूर्ण जागा एकही रुपया न आकारता मेट्रोला देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या निर्णयावर फडणवीस यांनी टीका केली आहे. 

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की  कांजूरची जागा राज्य सरकारचीच आहे, हे महसूल विभागाच्या जुन्या नोंदींवरून स्पष्ट होतं. ही जागा कारशेडला देण्याआधी जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन नोंदीची सर्व कागदपत्रं, जुन्या नोंदी तपासून खातरजमा केलेली आहे. तसंच सर्व संबंधित न्यायालयांतील प्रकरणांबाबतही विचार होऊन कायदेशीर खातरजमा केलेली आहे. त्यामुळे आधी जाहीर झाल्याप्रमाणे मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथेच उभारण्याचे काम सुरू राहील.

 
हेही वाचा : कायद्यापेक्षा कोणीही मोठा‌ नाही - गृहमंत्री अनिल देशमुख  
 
मुंबई : "कायद्यापेक्षा कोणीही मोठा‌ नाही.. कायदेशीर कारवाई केली आहे, नाईक यांच्या कुटुंबियांकडून माझ्याकडे तक्रार आलेली होती, कोर्टाच्या परवानगीनं ही केस ओपन झाली आहे," असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर अनिल देशमुख पत्रकारांशी बोलत होते. "केवळ सुडाच्या भावनेने ही केस पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली आहे," असा आरोप भाजपने केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख