राज्यातील सद्यस्थितीचा शरद पवारांनी घेतला आढावा

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील सद्यस्थिती, आर्थिक, सामाजिक घडामोडी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
3Pune_Sharad_Pawar_will_cont.jpg
3Pune_Sharad_Pawar_will_cont.jpg

मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील सद्यस्थिती, आर्थिक, सामाजिक घडामोडी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. 

या आढावा बैठकीस पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, दुग्धविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, विधान परिषदेचे सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते.

हेही वाचा : शरद पवार यांनी लक्ष घातल्यानंतर राज्यातील शिक्षकांसाठी 'गूड न्यूज'   

सोमेश्वरनगर ः ऐन कोरोना संसर्गाच्या काळात प्राथमिक शिक्षकांच्या होऊ घातलेल्या प्रशासकीय बदल्यांची टांगती तलवार दूर झाली आहे. ग्रामविकास विभागाने आज प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात येऊ नयेत, असे आदेश बजावले आहेत. तसेच, गैरसोयीच्या ठिकाणी कार्यरत शिक्षकांसाठी 'जिल्हांतर्गत विनंती बदल्या' समुपदेशन पध्दतीने करण्यासही हिरवा कंदील दाखविला आहे. धास्तावलेला गुरूजींसाठी ही गोड बातमी असूून त्यावर शिक्षक संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. कोरोनाचा ऐन संसर्ग भरात आलेला असताना ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्याची तयारी केली होती. बदलीपात्र अशा पंधरा टक्के शिक्षकांची माहिती जमा करून १० ऑगस्टला ऑफलाईन बदल्यांची प्रक्रिया पार पडणार होती. ऑफलाईन पद्धतीवर तर टीका झालीच पण कोरोनाच्या काळात बदल्यांची प्रक्रिया कशी करायची असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनांना पडला होता. शिवाय बदल्या झाल्यावर संसार पाठीवर टाकून बदलीच्या ठिकाणी कसे रुजू व्हायचे असा प्रश्न शिक्षकांना पडला होता.यात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी या प्रश्नात लक्ष घातले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com